पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीतील सेक्रेड हार्ट चर्चमध्ये भेट दिली. येथे पंतप्रधान मोदींनी देशात शांतता आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली आणि इस्टरचा संदेश दिला. पहिल्यांदाच पंतप्रधानांनी या चर्चला भेट दिली आहे. सेंट थॉमस कॅथलिक चर्चचे फादर फ्रान्सिस स्वामिनाथन म्हणाले की, आम्ही पंतप्रधान मोदींच्या आगमनाने उत्साहित आहोत.
'अदानींनी लोकलमध्ये छोट्या वस्तूही विकल्या'; पवारांनी यापूर्वीच सांगितला होता संघर्ष
चर्चमध्ये जाण्यापूर्वी पीएम मोदींनी ट्विटरवर इस्टरच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. 'इस्टरचा विशेष प्रसंग आपल्या समाजात शांतता आणि सौहार्द वाढवतो. हा उत्सव लोकांना समाजसेवेसाठी आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठी प्रेरणा देईल. या दिवशी आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र विचारांचे स्मरण करतो', असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलं होते.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची माहिती बिशप अनिल खुटो यांनी दिली. 'पंतप्रधानांनी पहिल्यांदाच या चर्चला भेट दिली, त्यामुळे हा आनंदाचा क्षण होता. पंतप्रधान मोदींनी मेणबत्ती पेटवून प्रार्थना केली आणि येथे एक रोपटेही लावले, असंही खुटो म्हणाले.