नवी दिल्ली - पश्चिम बंगालमधील घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. याच बरोबर, राज्य सरकार अशा लोकांना नक्कीच शिक्षा देण्याच्या दृष्टीने पावले उचलेल, आशाही मोदींनी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले मोदी - पंतप्रधान मोदी म्हणाले, 'पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये झालेल्या हिंसाचारासंदर्भात मी दुःख व्यक्त करतो. माझ्या संवेदना व्यक्त करतो. मी आशा करतो की, राज्य सरकार, बंगालच्या महान धरतीवर, असे पाप करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी नक्कीच पावले उचलेल.'
जनतेलाही केलं आवाहन -पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी बंगालच्या जनतेलाही आवाहन करेल की, अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना आणि अशा गुन्हेगारांची हिंमत वाढविणाऱ्यांनाही क्षमा करू नका.'
'केंद्र सरकार पूर्णपणे मदत करणार' -यासंदर्भात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारला, केंद्राकडून पूर्ण मदत मिळेल, असे आश्वासनही दिले आहे. मोदी म्हणाले, 'केंद्र सरकारच्या वतीने, मी राज्याला आश्वासन देतो की, गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा देण्याच्या दृष्टीने, जी कोणती मदत लागेल, ती मदत पुरवीली जाईल.'