नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिलीप कॉटलर प्रेसिडेंशियल पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. देशाचे उत्तम नेतृत्व केल्याबद्दल तसेच मोदींनी सुरू केलेल्या डिजिटल इंडिया कार्यक्रमामुळे प्रभावित होऊन त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. देशाला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निस्र्वार्थीपणे केलेली देशसेवा, संपूर्ण उर्जेनिशी आपल्या कर्तव्यांचे केलेले पालन आणि भारताला तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात प्रगती साधून दिली आहे, अशा शब्दात मोदींच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रदान करताना व्यक्ती, लाभ आणि पृथ्वी हे तीन घटक विचारात घेतले जातात. प्रसिद्ध मार्केटिंग गुरू फिलीप कोटलर हे आधीपासूनच मोदींच्या कार्यामुळे प्रभावित झालेले आहेत. त्यांनी मोदींच्या मेक इन इंडिया योजनेचे कौतुक केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची प्रतिमा सुधारली आहे. येणारा काळ हा भारतीय उत्पादनांचा असेल. तसेच चांगल्या मार्केटिंगमुळे भारताची प्रतिमा उजळणार आहे, असे कोटलर यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना फिलीप कॉटलर प्रेसिडेंशियल पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 5:42 PM
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिलीप कॉटलर प्रेसिडेंशियल पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
ठळक मुद्देभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलीप कॉटलर प्रेसिडेंशियल पुरस्काराने सन्मानित मोदींनी सुरू केलेल्या डिजिटल इंडिया कार्यक्रमामुळे प्रभावित होऊन पुरस्कारासाठी करण्यात आली मोदींची निवड