शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

70 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे; मोदी म्हणाले, "रोजगार मेळावा भाजप सरकारची नवी ओळख"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 12:24 PM

Rozgar Mela : नरेंद्र मोदी म्हणाले की, आज भारतात निर्णायक सरकार आणि राजकीय स्थिरता आहे. राजकीय भ्रष्टाचार, सरकारी योजनांमधील विसंगती आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर हे मागील सरकारांचे समानार्थी शब्द होते.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रोजगार मेळाव्यात 70,126 तरुणांना नियुक्तीपत्रे दिली. आज 70 हजाराहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. रोजगार मेळावा ही एनडीए-भाजप सरकारची नवी ओळख बनली आहे, असे रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच, 'रोजगार मेळाव्या'दरम्यान नवीन भरती झालेल्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, आज भारतात निर्णायक सरकार आणि राजकीय स्थिरता आहे. राजकीय भ्रष्टाचार, सरकारी योजनांमधील विसंगती आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर हे मागील सरकारांचे समानार्थी शब्द होते.

"रोजगार मेळावे एनडीए आणि भाजप सरकारची नवीन ओळख बनली आहेत. मला आनंद आहे की, भाजपशासित सरकारेही अशा रोजगार मेळाव्याचे सातत्याने आयोजन करत आहेत. सध्या सरकारी नोकरीत येणाऱ्यांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा आहे. येत्या 25 वर्षांत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य आहे", असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. याचबरोबर, मुद्रा योजनेमुळे करोडो तरुणांना मदत झाली आहे. स्टार्ट-अप इंडिया आणि स्टँड-अप इंडिया सारख्या मोहिमांनी तरुणांची क्षमता आणखी वाढवली आहे. सरकारकडून मदत मिळालेले हे तरुण आता स्वतः अनेक तरुणांना नोकऱ्या देत आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

भारत आपली अर्थव्यवस्था नव्या उंचीवर नेत आहे - नरेंद्र मोदीआज संपूर्ण जग आपल्या विकासाच्या प्रवासात आपल्यासोबत चालण्यास तयार आहे. भारतावर इतका विश्वास आणि आपल्या अर्थव्यवस्थेवरचा विश्वास यापूर्वी कधीच नव्हता. सर्व अडचणी असूनही भारत आपली अर्थव्यवस्था नव्या उंचीवर नेत आहे. जगातील मोठ्या कंपन्या उत्पादनासाठी भारतात येत आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. याशिवाय, भारतात सरकारी व्यवस्था आणि सरकारी कर्मचाऱ्यांची काम करण्याची पद्धत वेगाने बदलत आहे. आज सरकार आपल्या सेवा घेऊन देशातील नागरिकांच्या घराघरात पोहोचत आहे. आज लोकांच्या अपेक्षा आणि त्या भागातील गरजा समजून घेऊन आमचे सरकार सातत्याने काम करत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनjobनोकरी