मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यापासून परिस्थिती चिघळत आहे. पूर्वोत्तर राज्यात आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी २ महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून त्यांची धिंड काढली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे, यावरुन आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पीएम मोदी म्हणाले की, मणिपूरमधील घटना लज्जास्पद आहे. या घटनेने १४० कोटी देशवासीयांना लाज वाटली आहे. याशिवाय महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलली जातील, मणिपूर घटनेतील दोषींना सोडले जाणार नाही. मणिपूर घटनेवर राजकारण करू नये, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
८० लोकांना बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश; अमित शाह यांचा एकनाथ शिंदेंना फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, मणिपूरमध्ये जी घटना समोर आली आहे ती कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. पाप करणारे कोण आहेत, ते आपल्या जागेवर आहेत, पण संपूर्ण देशाचा अपमान होत आहे.१४० कोटी देशवासियांना लाज वाटत आहे. मी सर्व मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यांतील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्याचे आवाहन करतो. विशेषतः आपल्या माता भगिनींसाठी. कठोर पावले उचला, असंही मोदी म्हणाले.
पीएम मोदी म्हणाले, 'घटना राजस्थानची असो, छत्तीसगडची असो, मणिपूरची असो, भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील असो, या देशातील कोणत्याही राज्य सरकारमध्ये राजकारण, कायदे हे वादापेक्षा महत्त्वाचे आहेत, महिलांचा आदर केला जातो आणि मी देशवासीयांना आश्वासन देऊ इच्छितो की, कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही. कायदा त्याच्या सर्व कठोरतेने एकामागून एक पाऊल उचलेल. मणिपूरच्या या मुलींचे जे झाले ते कधीही माफ केले जाऊ शकत नाही.