शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) - कलेक्टिव सिक्युरिटी ट्रीटी ऑर्गनायझेशन (सीएसटीओ)च्या आउटरीच शिखर सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानसंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. अफगाणिस्तानात नुकत्याच झालेल्या घडामोडींचा भारतासारख्या शेजारील देशांवर सर्वाधिक परिणाम होईल, असे मोदींनी म्हटले आहे. म्हणूनच, या मुद्द्यावर प्रादेशिक फोकस आणि सहकार्याची आवश्यकता आहे. एवढेच नाही, तर जागतिक समुदायाने एकत्रितपणे आणि योग्य विचारविनिमय करून नव्या प्रणालीच्या मान्यतेवर निर्णय घेणे आवश्यक आहे. तसेच, यासंदर्भात भारताचा संयुक्त राष्ट्राला पाठिंबा आहे, असेही मोदी म्हणाले. (PM Narendra Modi says neighboring nations like india have been affected by Afghanistan)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानसंदर्भात 4 मुख्य मुद्द्यांवर लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, पहिला मुद्दा असा, की अफगाणिस्तानातील शासन बदल सर्वसमावेशक नाही आणि ते कुठल्याही संवादाशिवाय झालेले आहे. दुसरे म्हणजे, अफगाणिस्तानात अस्थिरता आणि कट्टरतावाद कायम राहिला, तर जगभरात दहशतवादी आणि अतिरेकी विचारधारेला उत्तेजन मिळेल. इतर अतिरेकी गटांना हिंसाचाराच्या माध्यमाने सत्ता मिळविण्याचे प्रोत्साहनही मिळू शकते.
कट्टरता जगासाठी सर्वात मोठं आव्हान; अफगाणिस्तान जिवंत उदाहरण; SCO समिटमध्ये PM मोदींचा प्रहार
मोदी म्हणाले, अफगाणिस्तानमध्ये ड्रग्ज, अवैध शस्त्रे आणि मानवी तस्करीचे प्रमाण वाढू शकते. अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक शस्त्रे राहिली आहेत. यामुळे, संपूर्ण प्रदेशातच अस्थिरतेचा धोका राहील. त्यांनी भयंकर मानवी संकट हा चौथा सर्वात मोठा मुद्दा, असल्याचे म्हटले आहे. याच बरोबर, आर्थिक आणि व्यापाराच्या प्रवाहात अडथळा आल्याने अफगाण जनतेची आर्थिक स्थिती बिघडत आहे. तसेच कोरोनाचे आव्हानही कायम आहे, याकडेही मोदींनी सर्वांचे लक्ष वेधले.