नवी दिल्ली : शाहीनबागमध्ये सुरू असलेले आंदोलन हे देशाची राज्यघटना न मानणाऱ्यांचे आंदोलन आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील प्रचारसभेत केली. अरविंद केजरीवाल विकासात अडथळे निर्माण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. शाहीनबागचे आंदोलन हा योगायोग नाही तर एक डाव असल्याचा आरोप करून ते म्हणाले, देश राज्यघटनेच्या चौकटीत चालत असते.
जनतेच्या हितासाठी कायदे करण्यात येत असते; परंतु उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला मानायचे नाही, असे ठरवून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात हिंसाचाराचे प्रकार होत आहेत. राज्यघटनेविरोधी कृती केल्या जात आहे. हा काय प्रकार आहे? ही कोणती मानसिकता आहे? दिल्लीला अराजकतेमध्ये सोडता येणार नाही. शाहीनबागच्या आंदोलनामुळे लाखो लोकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे.
सीएएविरोधातील चित्रे प्रदर्शनात लावल्याची खोटी तक्रार
नवी दिल्ली : येथे आयोजिलेल्या इंडियन आर्ट फेअरमध्ये नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा (सीएए) निषेध करणारी चित्रे प्रदर्शित केल्याची तक्रार आल्यामुळे पोलिसांनी रविवारी तिथे तपासणी केली. मात्र तिथे अशा प्रकारची कोणतीही चित्रे नसल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यांनी या तपासणीनंतर चित्रकारांकडे दिलगिरी व्यक्त केली.
प्रेम, सौंदर्य, कोमलता, महिलांचे सामर्थ्य अशा गोष्टी विषद करणारी गाणी व त्यावरील काही कलाकृतीही प्रदर्शनात आहेत अशी माहिती या प्रदर्शनात सहभागी झालेल्या चित्रकार गार्गी चंडोला यांनी दिली. त्यांनी सांगितले की, एखाद्या विषयाला केंद्रस्थानी ठेवून किंवा कोणत्यातरी गोष्टीला विरोध करण्यासाठी ही चित्रे काढलेली नाहीत.
सीएएविरोधातील निदर्शक इतरांच्या घरात घुसून तेथील बायकांवर बलात्कार करतील, अशी भीती भाजप नेत्यांकडून दाखविली असल्याची तक्रार १७० सामाजिक कार्यकर्ते व महिला गटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पत्र लिहिणाºयांत अर्थतज्ज्ञ देवकी जैन, सामाजिक कार्यकर्त्या लैला तय्यबजी, माजी राजदूत मधू भादूरी, ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वूमन्स असोसिएशन आदींचा सहभाग आहे. सीएएविरोधात अलिगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये भाषण करण्यास माजी विशेष पोलिस महानिरीक्षक अब्दुर रहमान यांना सोमवारी बंदी करण्यात आली.चार दिवसांतील तिसरी घटना; ‘जामिया’ परिसरात पुन्हा गोळीबार, गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचा आरोपनवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये गोळीबार करण्याचे सत्र सुरूच असून रविवारी रात्री ११.३० वाजता जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या सात क्रमांकाच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी अज्ञात माथेफिरुंनी गोळीबार केला. गेल्या चार दिवसांतील गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, दोन आरोपींवर त्यांचे लक्ष आहे. कारण त्या भागातील कॅमेऱ्यांनी त्यांच्या दुचाकीचा क्रमांक टिपला आहे.
‘गोळीबार करणाºयांवर गुन्हा दाखल करा’ या मागणीसाठी शेकडो निदर्शक जामियानगर पोलीस ठाण्यावर धडकले व ते तेथे पहाटे चार वाजेपर्यंत ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. दोन ते तीन तास आंदोलकांनी घोषणा दिल्या व पोलीस ठाण्यात जमावाने शिरण्याचा प्रयत्न केल्यावर गुन्हा दाखल करून घेतला. आरोपीने वापरलेल्या लाल रंगाच्या स्कूटरचे छायाचित्र आम्ही घेतले आणि त्या आधारे तिचा क्रमांकही ओळखला. तक्रार दाखल करून घेण्यास विलंब लावल्याचा इन्कार जामियानगर पोलिसांनी केला.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ परिसराच्या गेट क्रमांक सातजवळ झालेल्या या गोळीबाराच्या ठिकाणाची आम्ही पाहणी केली. तेथे आम्हाला कोणतेही रिकामे काडतूस सापडले नाही. त्यामुळे आम्ही आरोपीला शोधण्याचा आणि गुन्ह्याची खातरजमा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. योग्य त्या प्रक्रियेनंतर गुन्हा दाखल झाला, असे प्रभारी उप पोलीस आयुक्त (आग्नेय) ग्यानेशकुमार यांनी सांगितले.
अज्ञात व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. सीएएच्याविरोधात नवी दिल्लीत होत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी चार दिवसांत तिसºयांदा गोळीबार झालेला आहे. ताजा गोळीबार करणाºया दोन जणांपैकी एकाच्या अंगात लाल रंगाचे जॅकेट होते व ते चालवत असलेल्या वाहनाचा क्रमांक १५३२ किंवा १५३४ असावा, असे निदर्शकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, जामिया मिलिया इस्लामिया येथे नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याविरोधात निदर्शने होत असलेल्या ठिकाणी गेल्या आठवड्यात गोळीबार करणाऱ्या अल्पवयीन मुलाला शस्त्र पुरवल्याच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी अजीत (२५, रा. सहजपुरा, जिल्हा अलीगढ) याला सोमवारी अटक केली.
गोळीबार झालेल्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली आहे. आम्हाला घटनास्थळी रिकामे काडतूस सापडले नाही. सीसीटीव्ही आणि पुराव्यांच्या माध्यमांतून आरोपींना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. गुन्हा दाखल करून घेण्यात कोणत्याही प्रकारे विलंब झाला नाही.- ज्ञानेश कुमार, पोलीस उपायुक्त