PM Narendra Modi : "...रॅली रद्द होण्याचं कारण रिकाम्या खुर्च्या होत्या"; काँग्रेस नेत्यानं शेअर केला Video

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 11:07 AM2022-01-06T11:07:12+5:302022-01-06T11:07:46+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा बुधवारी दुपारी एका फ्लायओव्हरवर शेतकऱ्यांनी अडवला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली.

PM Narendra Modi security the reason for the cancellation of the rally was empty seats congress leader shared video | PM Narendra Modi : "...रॅली रद्द होण्याचं कारण रिकाम्या खुर्च्या होत्या"; काँग्रेस नेत्यानं शेअर केला Video

PM Narendra Modi : "...रॅली रद्द होण्याचं कारण रिकाम्या खुर्च्या होत्या"; काँग्रेस नेत्यानं शेअर केला Video

Next

पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान (India Pakistan) सीमेवर असलेल्या हुसैनीवाला येथील शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाहनांचा ताफा बुधवारी दुपारी एका फ्लायओव्हरवर शेतकऱ्यांनी अडवला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली. यानंतर मोदी पंजाबचा दौरा अर्धवट सोडून भटिंडा येथून विमानाने दिल्लीला रवाना झाले. याप्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने (Home Ministry) घेतली असून सुरक्षा यंत्रणेतील गंभीर उल्लंघन व केलेल्या ढिसाळपणाबद्दल पंजाब सरकारला (Punjab Government) खुलासा मागितला आहे. दरम्यान, काँग्रसचे नेते रणदीप सिंह सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी जोरदार निशाणा साधला आणि आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओही शेअर केला आहे.

"प्रिय नड्डाजी, रॅली रद्द होण्याचं कारण रिकाम्या खुर्च्या होत्या. जर विश्वास बसत नसेल तर पाहून घ्या. हे उगाच केलेलं वक्तव्य नाही. शेतकरी विरोधी मानसिकतेचं सत्य स्वीकार करा आणि आत्मचिंतन करा. पंजाबच्या लोकांनी रॅलीपासून लांब राहून अहंकारी सत्तेला आरसा दाखवला आहे," असं ट्वीट करत सुरजेवाला यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.


अमित शाहंनी व्यक्त केला संताप
पंजाबमध्ये घडलेल्या संपूर्ण प्रकाराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे. "पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत झालेल्या चुकीबाबत गृहमंत्रालयानं राज्य सरकारकडे अहवाल मागितला आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यात  सुरक्षेबाबतची कोणतीही हयगय अजिबात सहन केली जाऊ शकत नाही. याबाबत संबंधितांना उत्तर द्यावंच लागेल आणि संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी निश्चित केली जाईल", असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. 

"पंजाबमध्ये आज काँग्रेस निर्मित घटनेचा ट्रेलर पाहायला मिळाला आहे आणि यातूनच या पक्षाचे विचार कळतात. काँग्रेस पक्षाकडून काय काम केलं जातं हे दिसून येतं. लोकांनी वारंवार नाकारल्यानं काँग्रेस पक्षाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांनी याबाबत देशाच्या नागरिकांची माफी मागितली पाहिजे", असंही ट्वीट त्यांनी केलं.

Web Title: PM Narendra Modi security the reason for the cancellation of the rally was empty seats congress leader shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.