शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

धन्य झालो...! पंतप्रधान मोदींनी घेतलं 'राम सेतू'चं दर्शन; शेअर केला श्रीलंकेतून परततानाचा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 19:24 IST

मोदी श्रीलंकेहून थेट तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी विमानातून राम सेतूचे दर्शनही घेतले. यासंदर्भात त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे. त्यांनी राम सेतू दर्शनाचा एक व्हडिओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड आणि श्रीलंका दौऱ्यावरून पुन्हा भारतात परतले आहेत. ते श्रीलंकेहून थेट तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पोहोचले होते. यावेळी त्यांनी विमानातून राम सेतूचे दर्शनही घेतले. यासंदर्भात त्यांनी स्वतःच माहिती दिली आहे. त्यांनी राम सेतू दर्शनाचा एक व्हडिओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट केला आहे.

हा व्हडिओ शेअर करत पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे, "नुकतेच श्रीलंकेतून परतताना मला राम सेतूच्या दर्शनाचे सौभाग्य लाभले. आणि एक दिव्य संयोग म्हणजे, ज्या दिवशी आयोध्येत 'सूर्य तिलक' होत होता, त्याच दिवशी हे घडले. या दोन्ही दर्शनाने मी धन्य झालो. प्रभु श्री राम हे आपल्या सर्वांना जोडणारी एक शक्ती आहे. त्यांच्या आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहो..."

हिंदी महासागरातील हा राम सेतू प्रभू रामचंद्र आणि त्यांच्या सैनिकांनी लंकेवर कूच करण्यासाठी बांधला होता. याच सेतूवरून ते लंकेत गेले होते आणि राक्षसांचा राजा असलेल्या रावणाचा वध करून त्यांनी माता सीता यांना मुक्त केले होते, असे भारतीय समाज मानतो. पंतप्रधान मोदी विकास प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी आणि रामनवमी निमित्त प्रार्थना करण्यासाठी तामिळनाडूत पोहोचले होते.पंतप्रधान मोदींनी अनेक प्रकल्पांना दाखवला हिरवा झेंडा -खरेतर, पंतप्रधान मोदी श्रीलंका आणि थायलंड दौऱ्यावर होते. त्यांचा हा दौरा 3 एप्रिलला सुरू झाला होता. पंतप्रधान मोदी सर्वप्रथम बँकॉक येथे आयोजित बिम्सटेक परिषदेत सहभागी झाले. यानंतर ते श्रीलंकेला गेले. येथे त्यांनी अनेक प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवला. दरम्यान त्यांनी महाबोधी मंदिरातही दर्शन घेतले. यानंतर ते रविवारीच श्रीलंकेहून तामिळनाडूला परतत असताना त्यांना राम सेतूचे दर्शन घडले. 

टॅग्स :ram satputeराम सातपुतेNarendra Modiनरेंद्र मोदीSri Lankaश्रीलंकाTamilnaduतामिळनाडू