नवी दिल्ली: नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जींनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदींनी आता फोटोशूटकडे कमी आणि कामाकडे जास्त लक्ष द्यावं, असा सल्ला सिब्बल यांनी पंतप्रधानांना दिला आहे. मूळचे भारतीय असलेल्या अभिजीत बॅनर्जींना काल अर्थशास्त्रातलं नोबेल जाहीर झालं. यानंतर एका अमेरिकन वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना बॅनर्जींनी अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. 'भारतीय अर्थव्यवस्था दोलायमान अवस्थेत आहे. विकासदराची ताजी आकडेवारी पाहता, नजीकच्या भविष्यात अर्थव्यवस्था सावरेल, याची खात्री देता येत नाही. गेली पाच-सहा वर्षे निदान काही विकास होताना तरी दिसत होता, पण ती आशाही आता मावळली आहे,' असं बॅनर्जींनी म्हटलं होतं.
फोटोशूट कमी करा, कामाकडे लक्ष द्या; काँग्रेस नेत्याचा मोदींना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 3:35 PM