शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

तुम्हाला तुमचे पैसे चोरून स्वतःच्या घरात वाटणारा पंतप्रधान हवाय का?; मोदींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 3:45 PM

विरोधकांच्या महाआघाडीवर मोदींचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तुम्हाला कसा प्रधानसेवक हवा आहे? तुमचे पैसे चोरून स्वत:च्या घरात वाटणारा सेवक तुम्हाला हवा आहे का? असे प्रश्न विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांना केंद्रात कमकुवत सरकार हवं आहे. त्यांना केवळ स्वत:ची दुकानं चालवण्यात रस आहे. त्यासाठीच त्यांना केंद्रात दुबळं सरकार हवं आहे, अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीला लक्ष्य केलं. ते भाजपाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. या कार्यक्रमाला अनेक केंद्रीय मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित होते. आपण अतिशय कठोर परिस्थितीतून इथंवर पोहोचलो आहोत. आपण पक्षाला मजबूत केलं आहे. आपल्यावर संघटनेचं संस्कार नसते, तर दुसऱ्यांच्या मधाळ बोलण्यात आपण नक्की फसलो असतो. पक्षाच्या परंपरेमुळे, शिस्तीमुळे, लाखो कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि त्यागामुळे आज आपण इथे आहोत, असं मोदी म्हणाले. तुम्हाला नेमका कसा प्रधानसेवक हवा, असा सवाल त्यांनी विचारला. 'तुमचे पैसे चोरून स्वत:च्या घरात वाटणारा सेवक तुम्हाला हवा आहे का? तुमच्या घरातल्या गोष्टी शेजाऱ्यांच्या घरात जाऊन सांगणारा प्रधान सेवक तुम्हाला चालेल का?', असे प्रश्न मोदींनी उपस्थित केले. पंतप्रधानांनी विरोधकांच्या महाआघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. 'जे पक्ष कधीकाळी काँग्रेसच्या विरोधात होते, ज्यांची विचारधाराच काँग्रेसविरोधी होती, ते पक्ष आज एकत्र येत आहेत. तेलंगणात त्यांचा पराभव झाला. कर्नाटकमध्ये त्यांनी सरकार स्थापन केलं. तिथले मुख्यमंत्री म्हणतात, मी तर आता क्लर्क झालो आहे. विरोधकांचं हे चित्र हा तर निव्वळ ट्रेलर आहे. लवकरच यांचा पिक्चरदेखील दिसेल. हे सर्वकाही फक्त एका व्यक्तीविरोधात सुरू आहे,' असं मोदी म्हणाले. केंद्रात कमकुवत सरकार यावं. त्यामुळे घोटाळे करायला मिळावे आणि त्यातून स्वत:चं दुकानं चालावं, हीच या मंडळीची इच्छा आहे, अशा शब्दांमध्ये मोदींनी महाआघाडीला लक्ष्य केलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस