Pm Modi vs Congress: "काँग्रेस फक्त २ राज्यांतच शिल्लक, ती जिथून काँग्रेस जाते तिथे..."; मोदींना लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 02:20 PM2022-11-09T14:20:04+5:302022-11-09T14:20:58+5:30

काँग्रेसने केवळ लुटमार केली, भाजपाने मात्र विकासाची कामे केली- PM मोदी

Pm Narendra Modi slams Congress says wherever they are gone they never came back in power | Pm Modi vs Congress: "काँग्रेस फक्त २ राज्यांतच शिल्लक, ती जिथून काँग्रेस जाते तिथे..."; मोदींना लगावला टोला

Pm Modi vs Congress: "काँग्रेस फक्त २ राज्यांतच शिल्लक, ती जिथून काँग्रेस जाते तिथे..."; मोदींना लगावला टोला

Next

Pm Modi vs Congress: हिमाचल प्रदेशातील कांगडा येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. 'आता काँग्रेसचे सरकार फक्त २ राज्यांमध्ये उरले आहे. काँग्रेस जिथून जाते, तिथे त्यांना सत्तेत परतणे कठीण आहे,' असा टोला PM Narendra Modi यांनी लगावला. यासोबतच, काँग्रेसवर आतापर्यंत केवळ लुटमारीचेच काम केले, तर भारतीय जनता पक्षाने राजकीय कार्यपद्धती बदलून कामावर लक्ष केंद्रित केले आणि विकासाची कामे केली, असे विधानही पंतप्रधानांनी केले.

कांगडा येथील चंबी येथे एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "कांगडा ही भूमी शक्तीपीठांची भूमी आहे. हे भारताच्या श्रद्धा आणि अध्यात्माचे तीर्थक्षेत्र आहे. बैजनाथ ते काठगढपर्यंत या भूमीत बाबा भोलेंची असीम कृपा सदैव आपल्या सर्वांवर राहते. आज २१व्या शतकात हिमाचल विकासाच्या टप्प्यावर आहे. त्यांना स्थिर आणि मजबूत सरकारची गरज आहे. जेव्हा हिमाचलमध्ये मजबूत सरकार आणि दुप्पट सामर्थ्य असेल, तेव्हा ते आव्हानांवर मात करतील आणि तितक्याच वेगाने नवी उंची गाठतील."

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "विकासाचा नवा संकल्प घेऊन एवढा चांगला जाहीरनामा बनवल्याबद्दल सर्वप्रथम मी हिमाचल भाजपचे अभिनंदन करतो. हिमाचल भाजपचे लोक शुभ संकल्प करून येथील विकासाला नव्या उंचीवर नेतील. यावेळी उत्तराखंडच्या जनतेनेही जुनी परंपरा बदलून भाजपला विजय मिळवून दिला. उत्तर प्रदेशातही ४० वर्षांनंतर एखादा पक्ष पुन्हा जिंकला आणि पूर्ण बहुमताने सलग दुसऱ्यांदा सरकारमध्ये आला. मणिपूरमध्येही पुन्हा भाजपचे सरकार आले आहे. त्यामुळे लोकांचा भाजपावर विश्वास असल्याचे स्पष्ट झाले आहे," असेही त्यांनी नमूद केले.

Web Title: Pm Narendra Modi slams Congress says wherever they are gone they never came back in power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.