बराकपूर/हुगळी : ‘तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) नेत्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत. संदेशखाली येथील अत्याचारित महिलांना सत्ताधारी पक्षाचे गुंड धमकावत आहेत, या गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी ‘टीएमसी’ समोर आली आहे’, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे केली.
बराकपूर आणि हुगळी येथील सभांमध्ये माेदी म्हणाले की, टीएमसी प्रत्येक घरात बॉम्बबद्दल बोलते.
पंतप्रधान मोदींनी जनतेला दिल्या पाच गॅरंटी
- धर्माच्या आधारावर कोणीही आरक्षण देऊ शकत नाही.- एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाला हात लावला जाणार नाही.- राम नवमी साजरी करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.- राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल रद्द होणार नाही.- कोणीही सीएएची अंमलबजावणी थांबवू शकत नाही.
आम्ही अणुबाॅम्बला घाबरत नाही : शाह
कौशांबी (उत्तर प्रदेश) : मणिशंकर अय्यर आणि फारुख अब्दुल्ला यांच्यासारखे नेते म्हणतात की, पाकिस्तानचा आदर करा. कारण त्याच्याकडे अणुबॉम्ब आहे. पण, आम्ही अणुबाॅम्बला घाबरत नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठणकावून सांगितले.