पंतप्रधाननरेंद्र मोदी हे गुरूवारी दिल्लीतील राष्ट्रीय कॅडेट कोरच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना यावेळी गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आलं. "संविधानात नागरिकांच्या कर्तव्यांबाबत सांगण्यात आलं आहे, त्याचं पालन करणं हे सर्वांचं दायित्व आहे," असं मोदी यावेळी म्हणाले. तसंच विषाणू असेल किंवा सीमेवरील आव्हान भारत त्याचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच आता एनसीसीला मोठी जबाबदारी देण्यात येणार असून प्रशिक्षणही सुरू झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि तिनही दलांचे प्रमुख उपस्थित होते. "विषाणू असो किंवा सीमेवरील आव्हा भारत पूर्ण ताकदीनीशी तयार आहे हे गेल्या वर्षानं सर्वांना दाखवून दिलं आहे. आज देशात दोन स्वदेशी कोरोना प्रतिबंधात्मक लसी तयार करण्यात आल्या आहेत. लष्कराचं आधुनिकीकरण करण्यात येत आहे. देशाला राफेल विमानंदेखील मिळाली आहेत. लष्कराच्या गरजा आता भारतातच पूर्ण करण्यात येत आहेत," असंही मोदी यावेळी म्हणाले.
एनसीसीला आता मोठी जबाबदारी देणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती
By जयदीप दाभोळकर | Published: January 28, 2021 1:53 PM
प्रशिक्षणाला सुरूवात, राष्ट्रीय कॅडेट कोरच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केलं संबोधित
ठळक मुद्देराष्ट्रीय कॅडेट कोरच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केलं संबोधितसंविधातील नागरिकांसाठीच्या कर्तव्यांचं पालन करणं आपलं दायित्व, पंतप्रधानांचं वक्तव्य