नवी दिल्ली - संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला झालेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत उत्तर दिले. यावेळी पंतप्रधानांनी कोरोनाकाळातील देशातील व्यवस्थापन आणि शेतकरी आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करताना विरोधकांना जोरदार टोले लगावले. तसेच संपूर्ण भाषणानंतर अखेरच्या वाक्यात सतत टीका करणाऱ्या विरोधकांना जोरदार चिमटाही काढला.राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रस्तावाला उत्तर देताना मोदींनी सुरुवातीला कोरोनाकाळातील देशाची स्थिती आणि शेतकरी आंदोलनावर भाष्य केले. या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या विरोधकांना मोदींनी प्रसंगी प्रत्युत्तर देत तर कधी विरोधकांचीच आधीची मते दाखले म्हणून देत टोले लगावले. तसेच शेतकरी आंदोलनात कळीचा मुद्दा ठरलेल्या हमीभावाबाबतही सभागृहात स्पष्टीकरण देतात हमीभाव कायम राहील, अशी घोषणा केली.
मोदींनी विरोधकांना फटकारले; म्हणाले, विरोध करण्यासाठी खूप मुद्दे, विरोध झाला पाहिजे, पण....