रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात रशिया अधिकच आक्रमक होत आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह काल रात्रीपासून क्षेपणास्त्रे डागली जात आहेत. धोका लक्षात घेऊन भारतीय दूतावासाने सर्व भारतीयांसाठी एक सूचना जारी केली आहे. अॅडव्हायझरीमध्ये सर्व भारतीयांना आज कीव्हमधून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याला जे काही मिळेल ते वापरून कीव्ह सोडण्यास सांगितले आहे.
आज सकाळी रशियन सैन्यानं खारकीववर हल्ला चढवला. अनेक सरकारी इमारतींना लक्ष्य करण्यासाठी एअर स्ट्राईक करण्यात आला. खारकीवमधील सरकारी इमारत रशियाच्या हल्ल्यात अवघ्या काही क्षणांत जमीनदोस्त झाली. रशियन सैन्यानं क्षेपणास्त्र डागल्यानंतर धुळीचे लोट पसरले. इमारतीच्या शेजारी असलेली वाहनांचं या हल्ल्यात मोठं नुकसान झालं. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली.
युक्रेनमधील खार्किव येथे आज सकाळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. नवीन शेखरप्पा असे मृताचे नाव आहे. तो २१ वर्षांचा होता. नवीन कर्नाटकातील हावेरी येथील चालगेरी येथील रहिवासी होता. बचावादरम्यान झालेल्या हल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला.
नवीनच्या मृत्यूनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी बोलून त्यांच्याकडून नवीनच्या वडिलांचा नंबर घेतला. त्यानंतर मोदींनी नवीच्या वडिलांसोबत फोनवरुन चर्चा करुन यावेळी दु:ख व्यक्त करत कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आज सकाळी रशियन सैन्यानं खारकीववर हल्ला चढवला. अनेक सरकारी इमारतींना लक्ष्य करण्यासाठी एअर स्ट्राईक करण्यात आला. खारकीवमधील सरकारी इमारत रशियाच्या हल्ल्यात अवघ्या काही क्षणांत जमीनदोस्त झाली. रशियन सैन्यानं क्षेपणास्त्र डागल्यानंतर धुळीचे लोट पसरले. इमारतीच्या शेजारी असलेली वाहनांचं या हल्ल्यात मोठं नुकसान झालं.
दोन दिवसांपूर्वीच केला होता व्हिडिओ कॉल-
दोन दिवसांपूर्वीच नवीनचं आपल्या कुटुंबियांशी बोलणं झालं होतं, नवीनने व्हिडिओ कॉल करुन आपल्या कुटुंबाला युक्रेनमधल्या परिस्थितीची माहिती दिली होती. इथं भीषण परिस्थिती असून लवकरात लवकर मायदेशात परतायचं असल्याचं त्याने आपल्या कुटुंबियांना सांगितलं होतं. पण दुर्देवाने तो परतलाच नाही. खारकीव्हच्या प्रशासनाने या आधीच सांगितलं होतं की, रशियाने या भागातील निवासी भागामध्ये गोळीबार केला. त्यामध्ये नेमकं किती नुकसान झालं याची त्यांनी माहिती दिली नव्हती. मात्र आता या गोळीबारात जवळपास ११ लोकांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येत आहे.