नवी दिल्ली - जम्मू काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या राज्यात स्थानिक पातळीवर पंचायत समिती, नगरपालिका अशा निवडणुका व्हायला हव्या होत्या हे आमचे प्रयत्न होते. मात्र तेथील फुटिरतावादी नेत्यांनी निवडणुका घेतल्या तर हत्या होतील, दंगली घडतील असा कांगावा केला. यातूनच आम्ही पीडीपीसोबतशी युती तोडली. आज त्या राज्यात स्थानिक पातळीवर निवडणुका होत आहेत. लोकं उत्स्फुर्तपणे मतदान करतात. 75 टक्के मतदान होतंय पण एकही हिंसक घटना घडली नाही. निवडणुका झाल्यातरच विकास होऊ शकतो असं मतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडले.
आज जम्मू काश्मीरमध्ये प्रत्येक घरात आज वीज पोहचली आहे. शौचालय बनले, कृषी आणि खादी क्षेत्राचा विकास झाला. पर्यटनामुळे जम्मू काश्मीरच्या विकासाला चालना मिळाली. आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत. फुटिरतावादी नेत्यांची कठोरतेने वागलो म्हणून हे शक्य झालं आहे. जे पुढे जाण्यासाठी तयार आहेत त्यांना घेऊन पुढे जाणार असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याचं आश्वासन चिंताजनक
कायदा रद्द करण्याची भाषा भाजपाने केली नाही. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देशद्रोह कायदा रद्द करण्याची भाषा फुटिरतावादी नेत्यांची आहे. काही वर्षांपूर्वी तामिळनाडूत न्युक्लिअर प्लांटचे आंदोलन झालं होतं त्यावेळी काँग्रेसने 6 हजार लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. देशाच्या तिरंग्याचा कोण अपमान करत असेल, कोणी आपल्या संविधानाचा अपमान करत असेल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चाललाच पाहिजे. सामान्य माणसांचे जीवन सुलभ करण्यासाठी जे जाचक कायदे आहेत ते आम्ही मोडीत काढले.
नरेंद्र मोदींचे काँग्रेसवर आरोप
मी आता देशभरात प्रचारासाठी नव्हे तर मतदारांचे आभार मानण्यासाठी जातोय, त्यांनी मला 60 महिने देश चालविण्याची संधी दिली, 60 वर्षाच्या तुलनेत 60 महिन्यात काम चांगले झाले. गेल्या 60 महिन्यात सरकारच्या कामामध्ये शिस्त, कठोर निर्णय, देशाच्या विकासाला गती देण्याचं काम केलं. स्वातंत्र्यानंतर फक्त 2 पंतप्रधान देशात झाले ते कॉंग्रेसच्या गोत्रातील नाही. एक अटलबिहारी वाजपेयी आणि दुसरे नरेंद्र मोदी आहेत. काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याने लोकांची निराशा केली. काँग्रेसने जी आश्वासने दिली ती फोल ठरली. काँग्रेसने जाहीरनाम्यात शॉर्टकट शोधला आहे. काँग्रेसचा निवडणुकीतील आश्वासनांचा ट्रॅक रेकॉर्ड खराब असल्याचा आरोप मोदींनी केला. दिडशे वर्षाची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष आहे, या पक्षात नवं नेतृत्त्व का निर्माण केलं जात नाही हा चिंतेचा विषय आहे असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
अखेर काय घडलं होतं 'त्या' रात्री? मोंदींनी उलगडलं एअर स्ट्राईकचं रहस्य