नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक भागांत पुन्हा निर्बंध लागू करावे लागले आहेत. कोरोनावरील लस उपलब्ध झाली असली तरी अनेकांच्या मनात शंका आहे. कोरोनावरील लस किती प्रभावी ठरेल, त्यामुळे काही साईड इफेक्ट्स तर होणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न देशवासीयांच्या मनात आहे. ते दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कोरोनावरील लस घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोना लस; ट्विटद्वारे जनतेला आवाहन करत म्हणाले…पंतप्रधान मोदींनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहनही केलं. एम्समध्ये कोरोना लस घेतल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली. आपण देशाला कोरोनामुक्त करू, असा निर्धारदेखील त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधानांनी भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पहिला डोस घेतल्याचं सांगण्यात येत आहे. भारत बायोटेकची कंपनी पूर्णपणे भारतात तयार झालेली आहे. लसीचं संशोधन आणि उत्पादन दोन्ही भारतात झालं आहे.
केरळ-पुदुचेरीची नर्स; आसामचा गमछा, नरेंद्र मोदींच्या कोरोना लशीमागच्या 'इलेक्शन कनेक्शन'ची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 9:02 AM