Narendra Modi in Rajya Sabha : विरोधकांवर मोदींचा निशाणा; सांगितलं, कोरोनाविरोधातील लढाईचं खर श्रेय कुणाला?
By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 8, 2021 11:33 AM2021-02-08T11:33:07+5:302021-02-08T11:36:09+5:30
मोदी म्हणाले, कोरोना संकट आले, तेव्हा संपूर्ण जग भारतासाठी चिंतित होते. भारताने स्वतःला सावरले नाही, तर जगासाठी मोठे संकट उभे राहील, असे त्यांना वाटत होते. भारतने आपल्या देशातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी एका अज्ञात शत्रूचा सामना केला. मात्र... (PM Narendra Modi targets opposition)
नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर झालेल्या चर्चेवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राज्यसभेत उत्तर देण्यासाठी उभे आहेत. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीवर आणि श्रेयवादासंदर्भात भाष्य करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. एवढेच नाही, तर या संकटाच्या काळात भारताने जगाला केल्या सहकार्याचाही उल्लेख केला. (The real credit for winning the battle against Corona pandemic goes to India says PM Modi)
मोदी म्हणाले, कोरोना संकट आले, तेव्हा संपूर्ण जग भारतासाठी चिंतित होते. भारताने स्वतःला सावरले नाही, तर जगासाठी मोठे संकट उभे राहील, असे त्यांना वाटत होते. भारतने आपल्या देशातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी एका अज्ञात शत्रूचा सामना केला. मात्र, आज संपूर्ण जगाला अभिमान वाटतो, की ही लढाई भारताने जिंकली. ही लढाई कुठल्याही सरकारने अथवा व्यक्तीने जिंकलेली नाही. पण, भारताला तर याचे श्रेय नक्कीच जाते. त्याचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे...? मात्र, त्याचीही चेष्टा केली जात आहे.
कोरोना काळात एका वृद्ध महिलेने आपल्या झोपडीबाहेर दीवा लावला. पण त्याचीही चेष्टा केली गेली. देशाचं मनोधैर्य खच्ची होईल, अशा विषयांचे राजकारण विरोधकांनी करू नये, असेही मोदी म्हणाले.
#WATCH LIVE: PM Modi replies in Rajya Sabha to the Motion of Thanks on the President’s Address.(Source: Rajya Sabha TV) https://t.co/FkIpRmd9kN
— ANI (@ANI) February 8, 2021
Narendra Modi in Rajya Sabha Live: 'कृषी कायद्यातील सुधारणेला शरद पवारांचा विरोध नाही'
भारत संपूर्ण जगाला मदत पोहोचवतोय -
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ज्या देशाला तिसऱ्या जगाचा भाग मानले जात होते, आज त्याच भारताने एका वर्षात दोन कोरोना लशी तयार केल्या आणि जगालाही मदत पोहचवत आहे. जेव्हा कोरोनाविरोधात औषध उपलब्ध नव्हते, तेव्हा भारतानेच जगातील 150 देशांना औषध पोहोचविले आणि आज लस आली आसतानाही भारतच जगाला लस पुरवत आहे. तसेच देशातही केंद्र आणि राज्यांच्या सरकारांनी एकत्रितपणे काम केले आहे, असेही मोदी म्हणाले.