शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

Narendra Modi in Rajya Sabha : विरोधकांवर मोदींचा निशाणा; सांगितलं, कोरोनाविरोधातील लढाईचं खर श्रेय कुणाला?

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 08, 2021 11:33 AM

मोदी म्हणाले, कोरोना संकट आले, तेव्हा संपूर्ण जग भारतासाठी चिंतित होते. भारताने स्वतःला सावरले नाही, तर जगासाठी मोठे संकट उभे राहील, असे त्यांना वाटत होते. भारतने आपल्या देशातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी एका अज्ञात शत्रूचा सामना केला. मात्र... (PM Narendra Modi targets opposition)

ठळक मुद्देकोरोना परिस्थितीवर आणि श्रेयवादासंदर्भात भाष्य करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.मोदी म्हणाले, कोरोना संकट आले, तेव्हा संपूर्ण जग भारतासाठी चिंतित होते.आज संपूर्ण जगाला अभिमान वाटतो, की ही लढाई भारताने जिंकली.

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर झालेल्या चर्चेवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राज्यसभेत उत्तर देण्यासाठी उभे आहेत. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीवर आणि श्रेयवादासंदर्भात भाष्य करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. एवढेच नाही, तर या संकटाच्या काळात भारताने जगाला केल्या सहकार्याचाही उल्लेख केला. (The real credit for winning the battle against Corona pandemic goes to India says PM Modi)

मोदी म्हणाले, कोरोना संकट आले, तेव्हा संपूर्ण जग भारतासाठी चिंतित होते. भारताने स्वतःला सावरले नाही, तर जगासाठी मोठे संकट उभे राहील, असे त्यांना वाटत होते. भारतने आपल्या देशातील नागरिकांचे रक्षण करण्यासाठी एका अज्ञात शत्रूचा सामना केला. मात्र, आज संपूर्ण जगाला अभिमान वाटतो, की ही लढाई भारताने जिंकली. ही लढाई कुठल्याही सरकारने अथवा व्यक्तीने जिंकलेली नाही. पण, भारताला तर याचे श्रेय नक्कीच जाते. त्याचा अभिमान बाळगायला काय हरकत आहे...? मात्र, त्याचीही चेष्टा केली जात आहे. 

...म्हणून पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत माजी पंतप्रधान देवेगौडांचे मानले आभार, विरोधकांवर केलं मोठं भाष्य!

कोरोना काळात एका वृद्ध महिलेने आपल्या झोपडीबाहेर दीवा लावला. पण त्याचीही चेष्टा केली गेली. देशाचं मनोधैर्य खच्ची होईल, अशा विषयांचे राजकारण विरोधकांनी करू नये, असेही मोदी म्हणाले.

Narendra Modi in Rajya Sabha Live: 'कृषी कायद्यातील सुधारणेला शरद पवारांचा विरोध नाही'

भारत संपूर्ण जगाला मदत पोहोचवतोय -पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ज्या देशाला तिसऱ्या जगाचा भाग मानले जात होते, आज त्याच भारताने एका वर्षात दोन कोरोना लशी तयार केल्या आणि जगालाही मदत पोहचवत आहे. जेव्हा कोरोनाविरोधात औषध उपलब्ध नव्हते, तेव्हा भारतानेच जगातील 150 देशांना औषध पोहोचविले आणि आज लस आली आसतानाही भारतच जगाला लस पुरवत आहे. तसेच देशातही केंद्र आणि राज्यांच्या सरकारांनी एकत्रितपणे काम केले आहे, असेही मोदी म्हणाले. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या