शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

“एकटा किती जणांवर भारी पडतोय हे देश पाहतोय,” विरोधकांच्या घोषणाबाजीदरम्यान मोदी कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 19:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यसभेतील भाषणादरम्यान विरोधकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी पंतप्रधानही आक्रमक झाल्याचे दिसून आले.

राज्यसभेच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधाननरेंद्र मोदींनी विरोधकांना धारेवर धरलं. ८५ मिनिटं चाललेल्या या भाषणात पंतप्रधान मोंदींनी नेहरू आणि गांधी कुटुंब, कलम ३५६, नोकरी आणि बरोजगारी सारख्या मुद्द्यांवर भाष्य केलं. 

“ज्यांना सत्तेशिवाय दुसरे काही दिसत नाही त्यांनी आर्थिक धोरणाचे अनर्थ धोरणात रूपांतर केले आहे. मी त्यांना सावध करू इच्छितो, या सभागृहाच्या गांभीर्याने मी त्यांना सांगू इच्छितो, आपापल्या राज्यात जा आणि समजावून सांगा की त्यांनी चुकीच्या मार्गावर जाऊ नका, बिनदिक्कत कर्ज घेऊन काय झालंय? शेजारील देशांची स्थिती पाहत आहात,” असं मोदी भाषणादरम्यान म्हणाले. “कर्ज घ्या, पुढची पिढी फेडेल, अशी त्यांची विचारसरणी आहे. कर्ज काढून तूप खाण्याचा विचार करणारे राज्य तर उद्ध्वस्त करतीलच पण देशही उद्ध्वस्त करतील. आजूबाजूचे देश बघा, जगात कोणीही त्यांना कर्ज द्यायला तयार नाही, ते संकटातून जात आहेत. देशाच्या आर्थिक आरोग्याशी खेळू नका. तुमच्या मुलांचे हक्क हिरावून घेणारे असे कोणतेही पाप करू नका,” असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. 

“सामाजिक न्याय, दोन वेळची पोळी यांसारखे प्रश्न आम्ही सोडवले आहेत, तुम्ही सोडवले नाहीत. स्वतंत्र भारताची स्वप्ने पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे. एक व्यक्ती किती लोकांवर भारी पडतोय हे देश पाहतोय. एका व्यक्तीमुळे किती लोकांवर ओझे आहे. घोषणा देण्यासाठीही त्यांना (खासदार) बदलावं लागतं. दोन मिनिटं ते बोलतात. इथे तासाभरापासून आवाज दाबला गेला नाहीये,” असं म्हणत पंतप्रधानांनी निशाणा साधला.

“जितकी चिखलफेक कराल…”“मी काम करतोय हे पाहून विरोधकांना त्रास होतोय. मला मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वेदना समजत आहेत. तुम्ही दलितांबद्दल जर बोलत असाल तर, त्याच ठिकाणी निवडणुकीत दलितांना विजय मिळाला हेही तुम्ही पाहायला हवे. आता जनता तुम्हाला नाकारतेय म्हणून तुम्ही इथे तुमचे रडगाणे गात आहात. भारत हे संघराज्य आहे. गेल्या दशकामध्ये अनेक विचारवंतांनी घरी बसून देशाला दिशा दिली. असे लोकही घरात बसलेले असतात ज्यांनी आयुष्यात अनेक यश मिळवले आहे. सभागृहात जे घडते ते देश ऐकतो आणि गांभीर्याने घेतो. त्यामुळे तुम्ही आमच्यावर जितकी टीका किंवा चिखलफेक करायचा प्रयत्न कराल, तितक्या जास्त ठिकाणी (भाजपाचे) कमळ उमलेल,” असं म्हणत मोदींनी खर्गेंच्या टीकेचा समाचार घेतला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस