नवी दिल्ली: पाकिस्तानभारतीय सीमेपासून कर्तारपूरमधील गुरुद्वारा दरबार साहिबपर्यत तर भारत गुरुदापूरमधील डेरा बाबा नानकापासून सीमेपर्यत बांधण्यात आलेल्या कॉरिडॉरचे आज (शनिवारी) उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती.
कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटनावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित करताना गुरु नानक देव यांची शिकवण शीख समुदायालाच नाही तर सर्व भारतीयांना प्रेरणादायी आहे. जम्मू- काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यामुळे तेथील शीख समुदायाला याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शीख बांधवांना देखील इतर भारतीयांप्रमाणे अधिकार मिळणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. त्याचप्रमाणे भारतीयांच्या भावना समजून या प्रकल्पाचे लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात आल्याने मी पाकिस्तान सरकार व पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार देखील पंतप्रधान मोदींनी मानले आहे.
पाकिस्तान भारतीय सीमेपासून कर्तारपूरमधील गुरुद्वारा दरबार साहिबपर्यंत तर भारत गुरदासपूरमधील डेरा बाबा नानकपासून सीमेपर्यंत कॉरिडॉर बांधण्यात आला आहे. गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर येत्या नोव्हेंबरमध्ये हा कॉरिडॉर सुरू करण्यात आला आहे. या कॉरिडॉर मार्गे पाकिस्तानातील दरबार साहिब येथे दररोज ५ हजार शीख भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे.