शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

धनत्रयोदशीला रोजगार मेळावा; नरेंद्र मोदी आज 75000 तरुणांना देणार नोकरीची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 8:10 AM

Narendra Modi : या मोहिमेला 'रोजगार मेळा' असे नाव देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : देशात यंदाची दिवाळी रोजगाराभिमुख असणार आहे. धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदीनोकरी आणि रोजगाराची भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 10 लाख कर्मचार्‍यांसाठी नियुक्ती मोहीम सुरू करणार आहेत. या मोहिमेला 'रोजगार मेळा' असे नाव देण्यात आले आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्याने भरती झालेल्या 75,000 तरुणांना ऑफर लेटर म्हणजेच नियुक्तीपत्रे देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा कार्यक्रम व्हर्च्युअल असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तरुणांना संबोधितही करतील.

पीएमओ अर्थात पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असणार आहे. या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांना मिशन मोडद्वारे 10 लाख पदांची भरती करण्याचे निर्देश दिले होते. सर्व सरकारी विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांनी हे निर्देश दिले होते.

38 मंत्रालये आणि विभागांमध्ये नियुक्त्यापंतप्रधानांच्या निर्देशानुसार सर्व मंत्रालये आणि विभाग मंजूर पदांवरील विद्यमान रिक्त पदे भरण्यासाठी मिशन मोडमध्ये काम करत आहेत. देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी भारत सरकारच्या 38 मंत्रालये आणि विभागांमध्ये नियुक्त केले जातील. नव्याने भरती झालेले कर्मचारी विविध स्तरावर (उदाहरणार्थ, गट-अ, गट-ब (राजपत्रित), गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क.) सरकारमध्ये रुजू होतील, असे पीएमओने सांगितले. 

कोणत्या विभागामध्ये नियुक्त्या?ज्या पदांसाठी नियुक्त्या केल्या जात आहेत, त्यामध्ये केंद्रीय सशस्त्र दलातील कर्मचारी, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, एलडीसी, स्टेनो, पीए, आयकर निरीक्षक, एमटीएस आणि इतरांचा समावेश आहे, असे पीएमओने सांगितले. तसेच, या नियुक्त्या मंत्रालये आणि विभाग स्वतःहून किंवा मिशन मोडमध्ये नियुक्त करणार्‍या एजन्सीद्वारे करत आहेत. या एजन्सींमध्ये संघ लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग आणि रेल्वे भरती मंडळाचा समावेश आहे. जलद भरतीसाठी निवड प्रक्रिया सुलभ आणि तांत्रिकदृष्ट्या कार्यक्षम बनवण्यात आली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीjobनोकरी