PM नरेंद्र मोदींनी सांगितला आत्महत्येवर 'जोक', राहुल गांधींनी घेतला पंतप्रधानांचा समाचार...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 03:46 PM2023-04-27T15:46:59+5:302023-04-27T15:48:02+5:30
राहुल गांधींनी ट्विटरवरुन पीएम मोदींवर निशाणा साधला.
भारतात दररोज अनेकजण आत्महत्या करतात. यात काही शेतकरी, काही विद्यार्थी तर काही प्रेमात विश्वासघात मिळाल्यामुळे जीवण संपवतात. कारण काहीही असो, आत्महत्या करणारा सुटतो पण त्याच्या कुटुंबीयांना खूप यातना सोसाव्या लागतात. या आत्महत्या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विनोदावर राहुल गांधी यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
राहुल गांधींची टीका
गुरुवारी (दि.27) पंतप्रधान नरेंद्र मोदी रिपब्लिक समिटमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना एक विनोद(जोक) सांगितला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आता याच विधानावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आहे. मोदींच्या वक्तव्याच्या काही वेळातच राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आणि म्हटले की, “आत्महत्येमुळे हजारो कुटुंबांनी आपली मुले गमावली आहेत. पंतप्रधानांनी त्यांची खिल्ली उडवू नये!” असे राहुल गांधी म्हणाले.
हज़ारों परिवार आत्महत्या के कारण अपने बच्चों को खोते हैं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 27, 2023
प्रधानमंत्री को उनका मज़ाक नहीं उड़ाना चाहिए!
काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?
कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “मला एक विनोद सांगायचा आहे, जो आपण लहानपणी ऐकायचो. एका प्राध्यापकाच्या मुलीने आत्महत्या केली. मरण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहिली, त्यात म्हटले की, मी जीवनाला कंटाळले आहे आणि मला जगायचे नाही. म्हणूनच मी तलावात उडी मारुन जीवन संपवत आहे. सकाळी प्राध्यापकांनी चिठ्ठी बघितली आणि त्यांना खूप राग आला. ते म्हणाले, मी इतकी वर्षे मेहनत केली आणि हिने स्पेलिंग चुकीचे लिहिले.''