शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

"फेब्रुवारीमध्ये अयोध्येत जाणं टाळा", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्व केंद्रीय मंत्र्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 7:01 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना अयोध्येत न जाण्याचा सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. यानंतर काल म्हणजेच मंगळवारी पहिल्याच दिवशी नवं रेकॉर्ड बनले आहे. पहिल्याच दिवशीच मंदिरात ५ लाख भविकांनी दर्शन घेतले. मंदिराकडे जाणारा रामपथ भाविकांच्या गर्दीने पहाटेपासूनच ओसंडून वाहत होता. अयोध्येत वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय मंत्र्यांना अयोध्येत न जाण्याचा सल्ला दिला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची आज (२४ जानेवारी) बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरात न जाण्याचा सल्ला दिला आहे. अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्या झाल्यापासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे व्हीआयपी नेते तिथे गेल्यास व्हीआयपी प्रोटोकॉलमुळे गर्दीत भर पडेल, परिणामी भाविकांना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी गर्दीमुळे फेब्रुवारीमध्ये रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणे टाळावे, असे सर्व केंद्रीय मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार, मार्च महिन्यात केंद्रीय मंत्री राम मंदिराच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. याबाबत आज मंत्रिमंडळाने आभार प्रस्ताव मंजूर केला. राजनाथ सिंह यांनी हा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवला होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांनी मंत्र्यांना राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत जनतेला काय संदेश आहे, अशी विचारणा केली. सर्व मंत्र्यांनी पंतप्रधानांना जनतेच्या संदर्भात प्रतिक्रिया दिल्या. यादरम्यान मंत्रिमंडळाने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

पहिल्याच दिवशी घेतला ५ लाख भाविकांनी दर्शनाचा लाभप्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजेच मंगळवारी २३ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांना राम मंदिर संकुल परिसरात प्रवेश देण्यास प्रारंभ झाला. दिवसअखेरपर्यंत सुमारे पाच लाख भाविकांनी मंदिर संकुलाला भेट दिल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत होणारी प्रचंड गर्दी पाहता येथे येणाऱ्या सर्व वाहनांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. तसेच, उत्तर प्रदेशचे वरिष्ठ अधिकारी मंदिराजवळ नियोजनासाठी तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आढावा घेतला. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशाच्या विविध भागातून अयोध्येत पोहोचणाऱ्या भाविकांना संयम आणि सहकार्याचे आवाहन केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर