नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नवरात्रोत्सवाची सुरुवात अतिशय हटके अंदाजात केली आहे. आजच्या दिवसाचे औचित्य साधून पीएम मोदींनी 'माडी' नावाचे नवीन गुजराती गाणे रिलीज केले आहे. स्वतः पीएम मोदींनी हे गाणे लिहिले आहे. गायक दिव्य कुमारने या गाण्याला आवाज दिला असून, मीट ब्रदर्सने गाण्याला चाल लावली आहे.
या नवीन 'माडी' नावाच्या गाण्याची माहिती देताना, मोदींनी दिव्य कुमार आणि मीट ब्रदर्सचे आभार मानले. 'माडी' हे पीएम मोदींनी यावर्षीच्या नवरात्रीसाठी लिहिलेले दुसरे गाणे आहे. शनिवारी पीएम मोदींनी सांगितले की, त्यांनी 'गरबो' नावाचे आणखी एक गाणे लिहिले आहे. शनिवारी पीएम मोदींनी 'गरबो' गाणे रिलीज केले होते. हे त्यांनी अनेक वर्षांपूर्वी लिहिलेले गाणे आहे. त्या गाण्याला गायिका ध्वनी भानुशालीने आवाज दिला आहे, तर तनिष्क बागचीने संगीतबद्ध केले आहे.
फार कमी लोकांना माहित आहे की, पीएम मोदींना साहित्य आणि लेखनात खूप रस आहे. ते कविता लिहितात, त्यांची गुजराती भाषेतील 14 पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकांची संपूर्ण यादी https://www.narendramodi.in/category/ebooks वर उपलब्ध आहे. त्यांनी लिहिलेली मूळ पुस्तके आणि त्यांची भाषांतरेही येथे दिली आहेत.