लखनऊ:पंतप्रधाननरेंद्र मोदी मोदी तब्बल ४७३७ कोटी खर्चून उत्तर प्रदेशमध्ये ७५ प्रकल्प उभे करण्यासाठी लखनऊमध्ये दाखल झाले. मोदींच्या उपस्थितीत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘न्यू अर्बन इंडिया’ थीम अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि शहरी विकास विभाग तसेच उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी सहभाग नोंदवला. यावेळी केंद्र सरकाने गरिबांच्या खात्यावर सुमारे १ लाख कोटी रुपये थेट पाठवले, असे प्रतिपादन केले. (pm narendra modi visits new urban india transforming landscape expo at lucknow up)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करत केंद्र सरकारसोबतच उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या कामाचे कौतुक केले. केंद्राने सुमारे १ लाख कोटी रुपये गरिबांच्या खात्यांवर जमा केल्याचे मोदी यांनी यावेळी नमूद केले. मला ते दिवसही आठवतात जेव्हा फार प्रयत्न करुनही उत्तर प्रदेश घरे बनवण्यामध्ये पुढे जात नव्हता. गरिबांना घरे बांधण्यासाठी केंद्र पैसे देत होते. योगी सरकार येण्याआधी जे सरकार होते त्यांना गरिबांसाठी घरे बनवायची नव्हती. आधी जे होते त्यांच्याकडे आम्हाला विनंती करावी लागायची, असे मोदी म्हणाले.
केंद्राने गरिबांच्या खात्यावर १ लाख कोटी थेट पाठवले
सन २०१४ च्या आधीच्या सरकारने शहरांमधील योजनांमध्ये केवळ १३ लाख घरे मंजूर केली. त्यापैकी ८ लाख घरे बनवण्यात आली. पीएम आवास योजनेअंतर्ग १ कोटी १३ लाखांहून अधिक घरांच्या उभारणीसाठी परवानगी दिली. ५० लाख घरे देण्यात आली. आम्ही घरांच्या डिझाइनपासून निर्मितीपर्यंत सर्व गोष्ट घरे वापरणाऱ्यांना ठरवायला सांगितले. दिल्लीत एसी कार्यालयांमध्ये बसून आम्ही निर्णय घेतलेले नाहीत, असा टोला लगावत आम्ही घरे किती मोठी असतील याचा निर्णय घेतला. २२ स्वेअर मीटरपेक्षा घरे छोटी असणार नाही असे आम्ही ठरवले. आम्ही थेट गरिबांना त्यांच्या खात्यांवर घरे बनवण्यासाठी पैसे पाठवले, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
३ कोटी घरांना लखपती होण्याची संधी मिळाली
पहिल्यांदाच तुम्हाला असे काही सांगू इच्छितो की माझे जे सहकारी आहेत जे झोपड्यांमध्ये राहत होते, ज्यांच्याकडे पक्की घरे नव्हती. अशा ३ कोटी घरांना या कार्यकाळामध्ये एकाही योजनेने लखपती होण्याची संधी मिळाली, असे नमूद करत देशात २५ ते ३० कोटी कुटुंब आहेत. तीन कोटी कुटुंब लखपती झालेत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.