नवी दिल्ली : अवयवदान हे ईश्वराचे रूप असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या ९९ व्या भागात सांगितले की, आज देशात त्याबाबत जागरूकता वाढत आहे आणि गेल्या १० वर्षांत अवयवदान करणाऱ्यांची संख्या तिप्पट वाढली आहे. यावेळी पंतप्रधानांनी ३९ दिवसांच्या अबाबत या चिमुकलीच्या अवयवदानाचा उल्लेख केला.
ऑल इंडिया रेडिओच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’मध्ये अवयवदान करणाऱ्या चंडीगड येथील चिमुकल्या अबाबतचे पालक सुखबीर सिंग संधू, सुप्रीत कौर आणि झारखंडच्या सरायकेला येथील स्नेहलता यांचा मुलगा अभिजित चौधरी यांच्याशी पंतप्रधानांनी अवयवदानाच्या अनुभवांबद्दल चर्चा केली. मोदी म्हणाले, ‘राज्यांच्या अधिवास स्थापनेची अटही काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच आता रुग्णाला देशातील कोणत्याही राज्यात जाऊन अवयवदानासाठी नोंदणी करता येणार आहे. अवयवदानासाठी ६५ वर्षांखालील वयोमर्यादा काढून टाकण्याचा निर्णयही घेतला आहे.’
चिमुकली मानवतेच्या अमर गाथेची अमर प्रवासी
अबाबतची कहाणी सांगताना पंतप्रधान म्हणाले की, ती केवळ ३९ दिवसांची असताना तिने हे जग सोडले, परंतु तिच्या पालकांनी मुलीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचे कौतुक करताना पंतप्रधान त्यांना म्हणाले, ‘तुमची मुलगी मानवतेच्या अमर गाथेची अमर प्रवासी बनली आहे. शरीराच्या एका अंशाच्या रूपाने ती आजही उपस्थित आहे.’ याच क्रमाने, पंतप्रधानांनी वयाच्या ६३ व्या वर्षी हृदय, किडनी आणि यकृतदान करणाऱ्या स्नेहलता चौधरी यांच्या मुलाशी चर्चा केली.
मोदी म्हणाले...
सर्व महिला भारताला आणि भारताच्या स्वप्नाला ऊर्जा देत आहेत, स्त्री शक्तीची ही ऊर्जा विकसित भारताचे जीवन आहे.n आज सौरऊर्जेच्या क्षेत्रात देश ज्या वेगाने पुढे जात आहे, ती स्वतःमध्ये एक अनोखी घटना आहे. मोठी उपलब्धी आहे.