नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (मंगळवारी) दुपारी ४ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. नुकताच रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या त्यांच्या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला होता. यामुळे आता ते नेमके काय बोलणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
Unlock 2 : अनलॉक-2साठी गाइडलाइन्स जारी; जाणून घ्या, काय राहणार सुरू काय राहणार बंद
एकिकडे देशातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 5 लाखच्याही पुढे गेला आहे. तर दुसरीकडे लडखमध्ये भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत मोदी दोन्ही विषयांवर जनतेशी संवाद साधतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, यावेळी ते आपल्या भाषणातून आत्मनिर्भर भारत अभियानावरही जोर देण्याची शक्यता आहे.
RSS, भाजपा नेत्यांची बैठक, चीन मुद्द्यावर सरकारला मदत करणार संघ
पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी यांच्यात हिंसक झटापट झाल्यापासून सीमेवरील तणाव प्रचंड वाढला आहे. यात भारताच्या 20 जवानांना हौतात्म्य आले होते. यानंतरही पंतप्रधान मोदी यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक, लडाख सीमेवरील परिस्थिती आणि सरकारची भूमिका या विषयांवर माहिती दिली होती.
India China Standoff : आता चीनला रोखणार हा 'अजेय योद्धा', लवकरच हवाई दलाच्या ताफ्यात होणार दाखल
टिकटॉक, यूसी ब्राउझरसह 59 चीनी अॅप्सवर बंदी -केंद्रातील मोदी सरकारने चीनला मोठा दणका दिला आहे. लोकप्रिय अॅप टिकटॉकसह 59 चिनी अॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत 59 चिनी मोबाईल अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राउझर आणि हॅलो अॅप यासारख्या लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे.
31 जुलैपर्यंत अनलॉक-2 -केंद्र सरकारने अनलॉक-2 साठीच्या मार्गदर्शक सूचना सोमवारी रात्री जारी केल्या आहेत. तसेच अनलॉक-2 31 जुलैपर्यंत सुरू राहील, असेही स्पष्ट केले आहे. सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे, 31 जुलैपर्यंत शाळा आणि महाविद्यालये, कोचींग क्लासेल बंद राहतील. याशिवाय आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो सर्व्हिस, सिनेमा गृहे, स्विमिंग पूल, थिएटर्स, बार, तसेच सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरही 31 जुलैपर्यंत निर्बंध राहतील.
कोरोनावरील ‘ही’ औषधं मिळणार मोफत? शासन स्तरावर विचार सुरू; खुद्द मुख्यंमत्र्यांनी सागितली नावं
या शिवाय, ज्या आंतरराष्ट्रीय विमानांना गृहमंत्रालयाने उड्डाणासाठी परवानगी दिली आहे, अशांना मात्र, यातून सूट असेल. तसेच अपवादात्मक स्थिती वगळता रात्री 10 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहील.