नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदीगुजरातमधील अहमदाबाद येथील सरदारधाम भवनचे शनिवारी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन करणार आहेत. तसेच, सरदारधाम भवन फेज -२ मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजनही नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. (pm narendra modi will inaugurate sardardham bhavan in ahmedabad today)
या भवनाच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न केले जात आहेत. समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी तसेच युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचेही प्रयत्न आहेत. सरदारधाम भवनात विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
या उद्घाटन समारंभादरम्यान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत. तसेच, या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल उपस्थित राहणार आहेत.
अहमदाबाद येथील सरदारधाम भवनमध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध आहेत. सरदारधाम भवन फेज -२ मुलींच्या वसतिगृहात 2 हजार मुलींसाठी वसतिगृहाची सुविधा असेल. दरम्यान, समाजात दुर्बल वर्गाच्या प्रगतीसाठी तसेच शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी तसेच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत सरदारधाम सातत्याने काम करत आले आहे.