शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

E-Shram Portal: एकच नंबर! पंतप्रधान नरेंद्र मोदी 38 कोटी लोकांना देणार मोठे गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 12:18 PM

Check benefits of e-SHRAM portal, who will be covered and more: धक्कादायक बाब म्हणजे आजवर या असंघटीत कामगारांची कोणाकडेही कोणतीच माहिती उपलब्ध नव्हती. यामुळे कोरोना काळात पहिल्या लॉकडाऊनवेळी सर्वाधिक याची गरज भासली. केंद्रीय कामगार मंत्रालयाचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी ई-श्रम पोर्टलचा लोगो लाँच केला होता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) आज देशातील कोट्यवधी असंघटीत कामगारांना मोठे गिफ्ट देणार आहेत. मोदी सरकारने कामगारांच्या हितासाठी ई-श्रम पोर्टल (shram Portal) बनविले आहे. याचे आज लाँचिंग आहे. यानंतर कामगार वर्ग आपली नोंदणी या पोर्टलवर करू शकणार आहेत. (What is E-Shram Portal, How to Register on E-Shram Portal, know everything)

हा मजुरांचा डेटाबेस असणार आहे. याच्या मदतीने मोदी सरकारच्या योजनांचा फायदा या लोकांना पोहोचविला जाणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे आजवर या असंघटीत कामगारांची कोणाकडेही कोणतीच माहिती उपलब्ध नव्हती. यामुळे कोरोना काळात पहिल्या लॉकडाऊनवेळी सर्वाधिक याची गरज भासली. केंद्रीय कामगार मंत्रालयाचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी ई-श्रम पोर्टलचा लोगो लाँच केला होता. 

या पोर्टलद्वारे देशभरातील विविध क्षेत्रातील 38 कोटी मजुरांची माहिती गोळा केली जाणार आहे. यामध्ये मजूर, प्रवासी मजूर, घर कामगार, बांधकाम कामगार, प्लॅटफॉर्म, शेतीतील मजूर आदींसारख्या असंघटीत क्षेत्रातील कामगार रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत. 

काय करावे लागेल...मजुर, कामगारांना आपले रजिस्ट्रेशन करावे लागेल. यामध्ये नाव, कामाचे क्षेत्र, पत्ता, कामाचा प्रकार, शिक्षण, कौशल्य आणि कौटुंबिक माहिती भरावी लागणार आहे. प्रवासी मजूर त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊ शकतात. ज्यांच्याकडे फोन नाही, लिहिता-वाचता येत नाही ते देखील या सीएससी केंद्रावर जाऊन नोंदणी करू शकणार आहेत. या नोंदणी झालेल्या कामगारांना युनिक अकाऊंट नंबर असलेले एक रजिस्ट्रेशन कार्ड देण्यात येणार आहे. या कार्डाचे नाव ई श्रम कार्ड असे ठेवण्यात आले आहे. ही माहिती त्यांच्या आधार क्रमांकाशी जोडली जाणार आहे. 

टोल फ्री नंबर जारी... (Toll free number of E-Shram Portal)य़ा करोडो कामगारांच्या सुविधेसाठी टोल फ्री नंबरही दिला जाणार आहे. ई-श्रम पोर्टलमरील रजिस्ट्रेशन वेळी कामगारांना आधार नंबर आणि बँक खाते नंबर द्यावा लागणार आहे. टोल फ्री नंबर 14434 हा असेल. (e-Shram portal: A database for unorganised sector workers)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी