नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एका व्हिडीओच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना स्वदेशी वस्तू वापरण्याचा त्यांनी लोकांना इशारा केल्याचे दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, खरेदी केलेल्या वस्तूमुळे देशातील नागरिकाचा फायदा झाला पाहिजे, असा विचार आपण खरेदी करतेवेळी केला पाहिजे.
दिवाळीच्या शुभेच्छा देताना नरेंद्र मोदी म्हणाले, 'माझ्या प्रिय देशवासियांनो! खरेदी करतेवेळी आम्ही विचार करतो की, जी वस्तू मी खरेदी करत आहे. त्यापासून माझ्या देशातील कोणत्या नागरिकाला फायदा होणार आहे. कोणा-कोणाच्या चेहऱ्यावर आनंद दिसणार आहे. गरिबांना फायदा झाला तर माझ्या आनंद अधिक असणार आहे. या दिवाळीच्या मी आपल्याला मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा देत आहे.'
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा संदेशाला केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.