PM मोदींचा दौरा 4 तासांचा अन् MP सरकार खर्च करणार 23 कोटी! बघा काय आहे खास?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 12:39 PM2021-11-13T12:39:43+5:302021-11-13T12:40:11+5:30

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत 30 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 5000 हून अधिक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत....

PM Narendra Modis 4 hour visit Madhya pradesh government will spend 23 crores | PM मोदींचा दौरा 4 तासांचा अन् MP सरकार खर्च करणार 23 कोटी! बघा काय आहे खास?

PM मोदींचा दौरा 4 तासांचा अन् MP सरकार खर्च करणार 23 कोटी! बघा काय आहे खास?

Next

भोपाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा आदिवासी परिषदेत सहभागी होण्यासाठी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे येत आहेत. पीएम मोदी भोपाळमध्ये चार तास थांबतील. यावेळी जंबूरी मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात ते  1 तास 15 मिनिटे मंचावर असतील. या कार्यक्रमांसाठी राज्य सरकार तब्बल 23 कोटी रुपये खर्च करणार आहे.

योथे लोकांना बसण्यासाठी मोठ-मोठे मंडप टाकण्यात आले आहेत. त्यात पडदेही लावले जात आहेत. गेल्या आठवडाभरापासून तीनशेहून अधिक कामगार या कामात गुंतले आहेत. या कार्यक्रमासाठी राज्य सरकार 16 कोटी रुपये खर्च करत असून त्यापैकी 13 कोटी रुपये फक्त जंबूरी  मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात खर्च होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशिवाय काही प्रमुख नेतेच मंचावर असणार आहेत.

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत 30 वरिष्ठ अधिकारी, 5000 हून अधिक पोलिस तैनात - 
पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत 30 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 5000 हून अधिक पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भोपाळ पोलिसांनी हॉटेलमध्ये थांबवलेल्या बाहेरील लोकांची माहितीही गोळा करण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नाही तर एक टीम तयार करून भाडेकरूंचे व्हेरिफिकेशनही केली जात आहे. आठ दिवसांत पोलिसांना 6 हजारांहून अधिक भाडेकरू शोधले आहेत.

पंतप्रधान देशातील पहिल्या पीपीपी मॉडेलवर आधारलेल्या रेल्वे स्थानकाचे करतील उद्घाटन - 
या कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले. बाहेरूनही पोलीस राहील, कडक बंदोबस्त असेल. एसपीजीचेही लक्ष आहे. सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री घटनास्थळाची पाहणीही करतील. यावेळी पंतप्रधान देशातील पहिल्या पीपीपी मॉडेलवर आधारलेल्या हबीबगंज रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील. या रेल्वे स्थानकाची पुनर्बांधणी जर्मनीच्या हेडलबर्ग रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. हबीबगंज रेल्वे स्थानकात मध्यप्रदेशचे पर्यटन तथा दर्शनीय स्थळे, जसे भोजपूर मंदिर, सांची स्तूप, भीमबैठिका, यांचे चित्र प्रदर्शित केले जातील. मुख्य दरवाजाच्या आत दोन्ही बाजूंच्या भिंतीवर भिल्ल, पिथोरा पेंटिंगही असेल. वेटिंग रूम आणि लाउंज एअर कॉन्कोर्स जे 84 मीटर लांब आणि 36 मीटर रुंद असेल. प्लॅटफॉर्मवर 1750 प्रवाशांसाठी स्टेनलेस स्टिलची सिटिंग व्यवस्थाही करण्यात आली आहे.

Web Title: PM Narendra Modis 4 hour visit Madhya pradesh government will spend 23 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.