आज अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला, देशभरातील उद्योगपती, सेलिब्रीटी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'प्रधानमंत्री सूर्यादय योजनेची घोषणा केली. या योजने अंतर्गत १ कोटी घरांवर छतावर सौरऊर्जा बसवली जाईल. खुद्द पंतप्रधान मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली. “जगातील सर्व भक्तांना सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या प्रकाशातून नेहमीच ऊर्जा मिळते. आज अयोध्येतील अभिषेक सोहळ्याच्या शुभमुहूर्तावर, भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी हा माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे.”, असं ट्विट मोदींनी केले.
राम मंदिर प्राण प्रतिष्ठेनंतर अयोध्येचा प्लॅन आखत असाल तर, हा टाइम टेबल खास आपल्यासाठी!
“मी अयोध्येहून परतल्यानंतर पहिला निर्णय घेतला आहे की, आमचे सरकार १ कोटी घरांवर रूफटॉप सोलर बसवण्याचे लक्ष्य घेऊन ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार आहे. यामुळे फक्त गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल कमी होणार नाही, तर भारत ऊर्जा क्षेत्रातही आत्मनिर्भर होईल, असंही मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
सोमवारी देश-विदेशातील लाखो रामभक्तांच्या साक्षीने अयोध्येतील राम मंदिराच्या गाभार्यात श्री रामललाच्या नवीन मूर्तीचा अभिषेक संपन्न झाला. त्यानिमित्ताने विशेष विधीत सहभागी होऊन श्री. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला अलौकिक क्षण म्हटले.'सियावर रामचंद्र की जय' आणि 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्या.
अभिषेक प्रसंगी लष्कराच्या हेलिकॉप्टरने नव्याने बांधलेल्या रामजन्मभूमी मंदिरावर पुष्पवृष्टी केली. यासह, उत्तर प्रदेशातील या मंदिर शहरात उत्सव सुरू झाला आणि लोकांनी नाच आणि गाऊन आपला आनंद व्यक्त केला. 'सियावर रामचंद्र की जय' आणि 'जय श्री राम'चा नारा देत पंतप्रधान मोदींनी अभिषेकनंतर आपल्या भाषणात म्हटले, "आमचा राम आला आहे." यावेळी प्राणप्रतिष्ठा करून मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. राम मंदिर मंगळवारपासून सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे.