PM नरेंद्र मोदींच्या भावाचा कार अपघात; प्रल्हाद मोदी जखमी तर नातवाचा पाय फ्रॅक्चर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 05:14 PM2022-12-27T17:14:20+5:302022-12-27T17:27:54+5:30

कर्नाटकातील मैसूरमध्ये हा कार अपघात झाला. यावेळी कारमध्ये प्रल्हाद मोदींचे संपूर्ण कुटुंबीय होते.

PM Narendra Modi's brother Pralhad Modi injured in car accident in Kerala | PM नरेंद्र मोदींच्या भावाचा कार अपघात; प्रल्हाद मोदी जखमी तर नातवाचा पाय फ्रॅक्चर

PM नरेंद्र मोदींच्या भावाचा कार अपघात; प्रल्हाद मोदी जखमी तर नातवाचा पाय फ्रॅक्चर

Next

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी एका कार अपघातात जखमी झाले आहेत. कर्नाटकातील म्हैसूरजवळील कडकोला येथे त्यांच्या कारचा अपघात झाला. यावेळी प्रल्हाद मोदींसोबत त्यांचे कुटुंबीय होते. या अपघातात सर्वजण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद मोदी हे त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नातवासोबत मर्सिडीज बेंझ कारमधून बांदीपुरा येथे जात असताना दुपारी दोनच्या सुमारास त्यांची कार दुभाजकावर आदळली. अपघाताच्या वेळी त्यांचा ताफाही त्यांच्यासोबत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रल्हाद मोदी यांच्या नातवाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, तर इतरांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. 

अपघातानंतर त्यांना म्हैसूरच्या जेएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर समोर आलेल्या छायाचित्रात कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. माहिती मिळताच म्हैसूरच्या पोलीस अधीक्षक सीमा लाटकर तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. यानंतर त्यांनी रुग्णालयालाही भेट दिली. 

Web Title: PM Narendra Modi's brother Pralhad Modi injured in car accident in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.