नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 72 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासियांना संबोधित केले. दिल्लीतील लाल किल्ला येथे त्यांनी ध्वजारोहण केले आणि देशातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, सर्जिकल स्ट्राइक, ओबीसी, भ्रष्टाचार, काश्मीर प्रश्न, देशातील अर्थव्यवस्था आणि वन रँक वन पेन्शनसारख्या अनेक योजनांच्या मुद्यावर नरेंद्र मोदींनी भाषण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे...- 'न गाली से न गोली से, काश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से' असे म्हणत काश्मीरमधील समस्येवर भाष्य केले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या उद्गारांचा दाखला देत नरेंद्र मोदींनी काश्मीरची समस्या गले लगाने से म्हणजे प्रेमानं संपेल असे सांगितले. - तिहेरी तलाकमुळे अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तिहेरी तलाकविरोधात आम्ही कायदा करतोय, मात्र त्याला काही जण विरोध करत आहेत. परंतु मुस्लिम महिलांना मी आश्वासन देते की, हा कायदा आणणारच.- प्रामाणिक करदात्यांमुळे सरकार गरीबांचे पोट भरत असून मी त्यांना अभिवादन करतो. प्रामाणिक करदात्यांमुळेच जनहिताच्या योजना राबवणे शक्य होते. या योजनांचे पुण्य करदात्यांनाच मिळते. - काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला सरकार माफ करणार नाही. कितीही संकट आली तरी, मी यासाठी माघार घेणार नाही. देशाला भ्रष्टाचार आणि काळा पैशाच्या वाळवीने पोखरले होते. मात्र, आता दिल्लीतील गल्लीबोळ्यात दलाल दिसत नाही. काळ बदलला आहे.- शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत ‘बीज से बाजार तक’ याअंतर्गत दुप्पट करण्याचे ध्येय आहे. कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव दिला आहे.- स्वच्छ भारत अभियानामुळे लाखो लहान मुलांना आरोग्यदायी जीवन मिळाले. उज्ज्वला, सौभाग्य योजनामुळे अनेकांचे जीवन बदलले. याचबरोबर, येत्या 25 सप्टेंबरपासून देशात जन आरोग्य अभियान ही आरोग्य सेवा आणली जाणार आहे. या योजनेच्यामाध्यमातून गरीब कुटुंबांना पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विम्याचा लाभ देणार आहे. देशातल्या 10 कोटी गरीब कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे.- 13 कोटी मुद्रा कर्ज, त्यापैकी 4 कोटी लोकांनी पहिल्यांदाच कर्ज घेतले, हा बदललेल्या हिंदुस्थानाचा पुरावा आहे. - ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा बहाल करण्यात आला आहे. - गेल्या दोन वर्षांमध्ये पाच कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढण्यात आले. भारतातली गरीबी संपवण्यासाठी गेल्या पाच वर्षांमध्ये आमच्या सरकारनं प्रयत्न केला आहे.- महिलांनी चांगलीच प्रगती केली आहे. देशात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टात तीन महिला न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली आहे. आमच्या कॅबिनेटमध्येही महिलांना सर्वाधिक स्थान दिले आहे.
-भारताचा पुत्र किंवा पुत्री नक्कीच अंतराळाचा तिरंगा फडकावेल. त्यानंतर अंतराळात मानवाला पोहोचणारा जगात भारत हा चौथा देश म्हणून नावारुपाला येणार आहे. शास्त्रज्ञांनी 100हून अधिक सॅटेलाइट अवकाशात पोहोचवल्यानंतर पूर्ण जगभरातून त्याचं कौतुक झालं. आता अंतराळात मानवाला पाठवण्याचं भारताचं लक्ष्य आहे.