पाटणा: कोरोनाची लस घेतल्यानंतर देणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो छापण्यात आलेला आहे. याबद्दल विरोधकांसोबतच भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे. झारखंड आणि छत्तीसगडनं तर प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्तान अवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी एक वेगळीच मागणी केली आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापण्यात यावा, अशी मागणी मांझी यांनी केली आहे.मस्तच! कोरोना चाचणीचा निष्कर्ष मिनिटात कळणार; श्वासाच्या आधारे झटक्यात निदान होणारबिहारमध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) सत्ता आहे. जीतनराम मांझी यांचा हिंदुस्तान अवाम मोर्चा या आघाडीतील घटकपक्ष आहे. त्यामुळेच मांझी यांनी केलेल्या मागणीनं सगळ्यांनाच धक्का बसला. 'कोरोनाची लस घेतल्यानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर मोदींचं छायाचित्र छापण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे कोरोनामुळे जीव गमावणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यू प्रमाणपत्रांवरदेखील मोदींचा फोटो असायला हवा,' असं ट्विट मांझी यांनी केलं आहे.कोरोना लसीकरण झालेल्या प्रमाणपत्रांवर पंतप्रधानांचा फोटो छापण्याची गरज काय, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. यानंतर आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्तान अवाम मोर्चानं त्यापुढे जात मोदींना खोचक टोला लगावला आहे. 'लसीच्या प्रमाणपत्रांवर फोटो छापण्याचा इतकी हौस असेल तर कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांच्या मृत्यू प्रमाणपत्रांवरदेखील फोटो छापला जावा. तेच न्यायाला धरून असेल,' असं मांझी यांनी ट्विटमध्ये म्हटलं. मात्र थोड्याच वेळात त्यांनी ट्विट डिलीट केलं. मेड इन इंडिया 'कोवॅक्सिन'बद्दल मोठी बातमी! कोरोनाविरुद्धच्या लढ्याला 'बूस्ट' मिळणारपंतप्रधानांना लक्ष्य करणारं ट्विट डिलीट करण्याच्या आधी त्यांनी रविवारी रात्री एक ट्विट केलं होतं. 'कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर मला एक प्रमाणपत्र देण्यात आलं. त्यावर पंतप्रधानांचा फोटो आहे. देशातील घटनात्मक संस्थेचे प्रमुख राष्ट्रपती असतात. त्या नात्यानं प्रमाणपत्रावर राष्ट्रपतींचा फोटो असायला हवा. फोटो छापायचाच असेल तर राष्ट्रपतींच्या जागी पंतप्रधानांचा आणि स्थानिक मुख्यमंत्र्यांचा फोटो छापता येईल,' असं मांझी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
CoronaVirus News: कोरोना मृतांच्या मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापा; भाजपच्या मित्रपक्षाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 2:39 PM