नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर लोकप्रिय नेते आहेत. सोशल मीडियामध्येनरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटला 7 कोटी यूजर्सने फॉलो केले आहे. नरेंद्र मोदी हे जगातील सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचे समोर आले आहे. नरेंद्र मोदी यांनी 2009 मध्ये ट्विटर अकाऊंट वापरण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. 2010 मध्ये त्यांचे एक लाख फॉलोअर्स होते. तर, 2011 मध्ये त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 4 लाखांपर्यंत पोहोचली होती.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट निलंबित झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे नाव लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल स्थानी आले. मात्र नरेंद्र मोदींच्या आधी हे शीर्षक डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर नोंदले गेले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक अकाऊंटला 88.7 मिलियन म्हणजेच 8 कोटी 87 लाख लोक फॉलो करत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सक्रिय नेत्यांच्या यादीत दुसर्या क्रमांकावर होते. नरेंद्र मोदींना 64.7 मिलियन म्हणजेच 6 कोटी 47 लाख लोक फॉलो करत होते. आता फॉलोअर्सची ही संख्या वाढून 70 मिलियन म्हणजे 7 कोटी झाली आहे.
याआधी 2020 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान ट्विटर, यूट्यूब, गूगल सर्चवर ट्रेडिंग चार्टमध्ये अव्वल होते. अशात एका स्टडीनुसार, या काळात त्याचे ब्रँड व्हॅल्यू सुमारे 336 कोटी रुपये होते. हे ब्रँड मूल्य सोशल मीडिया एंगेजमेंट आणि फॉलोअर्सच्या आधारावर तयार करण्यात येते.
दरम्यान, नरेंद्र मोदी त्यांच्या फॉलोअर्सशी संवाद साधण्यासाठी आणि राजकीय वक्तव्यांसाठी ट्विटरचा वापर करतात. नरेंद्र मोदी यांचे फेसबुक अकाऊंट असून युट्युब चॅनेल देखील आहे. नरेंद्र मोदी सोशल मीडियाद्वारे त्यांना द्यायचा असलेला संदेश त्यांच्या फॉलओर्सपर्यंत पोहोचवतात. स्वच्छ भारत अभियान, महिला सुरक्षा, यासारख्या इतर अभियानांसाठी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे.