शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
2
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
3
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
4
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
5
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
6
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
7
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
8
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
9
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
10
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
11
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
12
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
13
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
14
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
15
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
16
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
17
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
18
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
19
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
20
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ

पीएम केअर्समधून पंतप्रधान वगळणार?; न्यायालयात जनहित याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 6:02 AM

ट्रस्टच्या संकेतस्थळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रध्वज आणि राजमुद्रा यांचा फोटोही काढण्यात यावा, जनहित याचिकेद्वारे न्यायालयाकडे मागणी.

मुंबई : ‘पी.एम. केअर्स’ ट्रस्टच्या नावातून ‘प्राइम मिनिस्टर’ वगळावे तसेच या ट्रस्टच्या संकेतस्थळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रध्वज आणि राजमुद्रा यांचा फोटोही काढण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेद्वारे महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला या याचिकेवर २३ डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले.

काँग्रेसचे सदस्य विक्रांत चव्हाण यांनी याबाबत ॲड. सुहास ओक व ॲड. सागर जोशी यांच्याद्वारे ही जनहित याचिका दाखल केली. याचिकेनुसार, खासगी ट्रस्टच्या संकेतस्थळावर अशा पद्धतीने राजमुद्रेचे आणि राष्ट्रध्वजाचे फोटो वापरणे हे राज्यघटनेतील तरतुदींचे उल्लंघन करणारे आहे. तसेच भारतीय राजमुद्रा व नावे (अयोग्य वापर प्रतिबंध) कायद्याचेही उल्लघंन करणारे आहे.

याचिकेनुसार, २७ मार्च २०२० रोजी ‘पी.एम. केअर्स फंड’ स्थापन करण्यात आली. या निधीतून गंभीर आजारी असलेल्या नागरिकांना मदत केली जाते. तसेच आपत्कालीन स्थितीतही नागरिकांना मदत करण्यात येते. या ट्रस्टला नागरिक किंवा काही संस्था देणगी देतात. ही ट्रस्ट कोणतेही सरकारी किंवा सार्वभौम कर्तव्य पार पाडत नाही. ट्रस्टमध्ये जमा होणारा निधी सरकारचा नाही आणि ही रक्कम सरकारकडे जमा होत नाही, असे याचिकेत म्हटले आहे. अशा स्थितीत या ट्रस्टवर राष्ट्रध्वज, राजमुद्रेचा व पंतप्रधानांचा फोटो वापरणे अयोग्य आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश :केंद्र सरकारने याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल केले नाही का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाचे  मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांना केला. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही २३ डिसेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करा, असे निर्देश देत खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी ३ जानेवारी रोजी ठेवली. ट्रस्टमध्ये जमा होणारा निधी केंद्र सरकारचा नाही आणि ही रक्कम केंद्र सरकारकडे जमा होत नाही, असे याचिकाकर्त्याने आपल्या अर्जामध्ये म्हटले आहे. अशा स्थितीत या ट्रस्टवर राष्ट्रध्वज, राजमुद्रेचा व पंतप्रधानांचा फोटो वापरणे अयोग्य आहे, असेही याचिकाकर्त्याने अर्जामध्ये नमूद केले आहे. २७ मार्च २०२० रोजी ‘पी.एम. केअर्स फंड’ स्थापन करण्यात आली.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानCourtन्यायालय