- संतोष ठाकूर नवी दिल्ली - स्पेक्ट्रम घोटाळा, विदेशी कंपन्यांवर मेहेरनजर असे अनेक आरोप झालेले केंद्रीय दूरसंचार मंत्रालय सध्या नवीन धोरण तयार करीत आहे. त्यातील तरतुदींचा पंतप्रधान कार्यालय बारकाईने अभ्यास करणार आहे. तिथून हिरवा कंदिल मिळाल्यानंतरच या धोरणाची अंमलबजावणी होईल.नव्या तरतुदींची माहिती लवकरच जनतेसमोर ठेवली जाईल. चालू वर्षीच्या मध्याला धोरण अमलात आणण्याचा खात्याचा मनसुबा आहे. आर्टिर्फिशियल इंटलिजन्स, मशिन टू मशिन टेक्निक, फाइव्ह जी, इंटरनेट आॅफ थिंग्ज आदी गोष्टींचा उल्लेख या धोरणात असेल.
दूरसंचार धोरणात पंतप्रधान सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 1:34 AM