- संजय शर्मानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना पाहताच ‘थकलात?’ असे विचारले व सर्वत्र हास्याचे कारंजे उडाले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणे सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटत होते. त्यावेळी कुणाच्या पाठीवर हात ठेवत होते, तर कुणाचा हात हातात घेत होते.
याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी आले तेव्हा पंतप्रधानांनी त्यांना थेट विचारले, थकलात? याचे अनेक अर्थ लावले जात आहेत. मोदींच्या या विचारण्याने तेथील नेत्यांना हसू आले. अनेक जण पंतप्रधानांची ही टिप्पणी राहुल गांधी यांच्या यात्रेशी जोडून पाहत आहेत. या यात्रेची श्रीनगरमध्ये सांगता झाली. या टिप्पणीबाबत काँग्रेस नेत्यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, याचे उत्तर अधीर रंजन चौधरी हेच देऊ शकतात.
चिराग पासवान यांच्याशी जास्त काळ बातचीत- नेत्यांशी भेटताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत रामविलास पासवान यांचे पुत्र व लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांच्याशी सर्वांत जास्त काळ बातचीत केली. - यावेळी चिराग यांच्या पाठीवर थापही मारली. विशेष म्हणजे मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार जेव्हा होईल, तेव्हा त्यात चिराग पासवान यांना कॅबिनेट मंत्री केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. - पंतप्रधानांनी चिराग पासवान यांच्याशी प्रदीर्घ बातचीत केल्याने याचे संकेतही त्यातून मिळतात.