मुंबई - जर तुम्हीही नेहमी बँक अकाऊंटमध्ये कमी बॅलन्स ठेवत असाल किंवा बॅलन्सच टेवत नसाल तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. ही बातमी वाचल्याने आणि त्यादिशेने पावले उचलल्याने तुमचे चार लाख रुपयांपर्यंतचे नुकसान टळू शकते. हो, पहिल्यांदा तुम्हाला ही बाब गंमत वाटेल मात्र ती अगदी खरी आहे. त्याचं कारण म्हणजे पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना रिन्यू करण्याची तारीख जवळ आली आहे.
सरकारच्या या दोन्ही योजनांना वार्षिक आधारावर रिन्यू करण्यासाठी अंतिम तिथी ३१ मे आहे. जर तुमच्या खात्यामध्ये योग्य बॅलन्स नसेल आणि या दोन्ही योजना रिन्यूअल झाल्या नाहीत तर तुम्हाला चार लाख रुपयांचा विमा मिळणार नाही. त्यामुळे तुमचे चार लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते. आज आपण जाणून घेऊयात या योजनांच्या अटीशर्तींबाबत.
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेमध्ये कुठल्याही कारणाने होणाऱ्या मृत्यूसाठी संरक्षण दिलं जातं. १८ ते ५० वर्षांदरम्यान तुम्ही या योजनेशी संलग्न होऊ शकता. ५० वर्षांच्या वयापूर्वी या विमा योजनेशी जोडले गेल्यास आणि प्रीमियमचा भरणा केल्यास तुमच्या जीवनाला ५५ व्या वर्षापर्यंतच कव्हर मिळेल.
सरकारच्या या योजनेंतर्गत तुम्हाला ३३० रुपये प्रतिवर्ष भरणा केल्यावर २ लाख रुपयांचे जीवन विमा कव्हर मिळू शकेल. याची नोंदणी तुम्ही बँकेची शाखा, बीसी पॉईंट किंवा पोस्ट ऑफीसमधून करू शकता. योजनेमध्ये प्रीमियम तुमच्या अकाऊंटमधून ऑटो डेबिट होईल.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये कुठल्याही दुर्घटनेमुळे होणारे मृत्यू किंवा अपंगतेसाठी सुरक्षा कव्हर दिलं जातं. या योजनेमध्ये तुम्ही १८ व्या वर्षापासून ७० व्या वर्षापर्यंत जोडले जाऊ शकता. या योजनेंतर्गत दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये आणि अंशत: अपंगत्व आल्यास १ लाख रुपये देण्याची तरतूद आहे. या योजनेचा वार्षिक प्रीमियम १२ रुपये आहे. याअंतर्गत दोघांचेही एकूण प्रीमियम एकूण २४२ रुपये एवढा होतो.