शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

केंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पीएमओचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 7:42 PM

सीबीआयमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे केंद्रीय मंत्र्यावर गंभीर आरोप

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयानं नकार दिला आहे. या प्रकारची माहिती देणं अतिशय जटील असल्याचं उत्तर पंतप्रधान कार्यालयानं माहिती अधिकाराच्या अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जाला दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे. सीबीआयमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं केंद्रीय कोळसा राज्यमंत्री हरिभाई पार्थीभाई चौधरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. नेमक्या याचवेळी पंतप्रधान कार्यालयानं केंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींची माहिती देण्यास असमर्थता दर्शवली आहे. केंद्रीय मंत्र्यांविरोधातील भ्रष्टाचारांच्या तक्रारींचा तपशील माहिती अधिकाराच्या माध्यमातून मागवण्यात आला होता. मात्र हा तपशील देण्यास पंतप्रधान कार्यालयानं नकार दिला. 'पंतप्रधान कार्यालयाला मंत्री आणि अधिकाऱ्यांविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारी मिळत असतात. यामध्ये निनावी तक्रारी आणि बदनामीसाठी दाखल केलेल्या तक्रारींचाही समावेश असतो. त्यामुळे या तक्रारींची शहानिशा करुन त्यासंबंधीची कागदपत्रं तपासून कारवाई केली जाते,' असं उत्तर माहिती अर्जाला देण्यात आलं. 'आवश्यक कारवाई केल्यानंतर यासंबंधीची कागदपत्रं एका जागी ठेवण्यात येत नाहीत. ही कागदपत्रं विविध विभागांना पाठवण्यात येतात. त्यामुळे याबद्दलचा तपशील देणं अतिशय जटील आहे,' असं उत्तर आरटीआयला पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलं आहे. पीएमओमधले नोकरशाह संजीव चतुर्वेदी यांनी या प्रकरणात आरटीआय दाखल केला होता. भारतीय वन विभागात अधिकारी असलेल्या चतुर्वेदी यांनी एम्समध्ये मुख्य सतर्कता अधिकारी म्हणून काम करताना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं उजेडात आणली होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानministerमंत्रीCorruptionभ्रष्टाचारBJPभाजपा