ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदी निवड होण्याआधीच व राष्ट्रीय पातळीवर येण्याआधीच गुजरातचे विकास पुरूष म्हणुन सोशल मिडियात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. तरुण मतदारांना त्यांनी आकर्षीत करुन नवा मदतार जागृत करत पंतप्रधान पदावर विराजमानतर झालेच त्याशिवाय आपल्या पक्षाला एरहाती विजय मिळवून दिला. मोदींनी सोशल मिडियाची ताकद , व्याप्ती व त्याचे भविष्य ओळखत भारतातील बहुतेक नेत्यांआधी त्यांनी सोशल मिडियाचा शितापिने वापर केला होता. आज पुन्हा त्याचीच प्रचीती आली आहे.
पंतप्रधानांची इंग्रजीमध्ये असणारी वेबसाईट आज सहा प्रादेशिक भाषेमध्ये सुरु करण्यात आली आहे. त्याद्वारे जनतेशी तसेच मतरांनी अधिकाधिक जवळीक वाढेल. नवी दिल्ली येथे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या सहाही वेबसाइट लाँच केल्या. यामध्ये बंगाली, गुजराती, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि मराठीचा समावेश आहे. PMOच्या वेबसाइट यांमध्ये विविध योजना,कामे लोंकाप्रर्यंत पोहचवण्यांचा त्यांचा हेतू असेल.
EAM Swaraj inaugurates 6 language (Bengali,Marathi,Gujarati,Malayalam, Tamil&Telugu) versions of PMO India website pic.twitter.com/gGDwDWcaOV— ANI (@ANI_news) May 29, 2016
पंतप्रधान कार्यालयाची वेबसाइट आता सहा प्रादेशिक भाषांमध्ये असणार आहे. केंद्राच्या योजना, कामे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारने उचलेलं हे एक पाऊल आहे असे म्हणावे लागेल..