नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी फरार घोषित करण्यात आलेला व्यावसायिक मेहुल चोक्सी याच्या अडचणीत आता दिवसेंदिवस अधिकाधिक वाढ होत आहे. ईडीने पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्या प्रकरणी गीतांजली ग्रुप आणि मुख्य आरोपी असलेला या ग्रुपचा प्रमुख मेहुल चौक्सीची १४ कोटींहून अधिक रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. पीएनबी बँकेतील एकूण घोटाळा हा १३ हजार कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत असते.ईडीने या कारवाईबाबत एक पत्रक प्रसिद्ध करून माहिती दिली आहे. यात ईडीने म्हटले आहे की, प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये मुंबईतील गोरेगाव परिसरातील ओ२ टॉवरमधील १४६० चौकिमीचा फ्लॅट, सोने आणि प्लॅटिनमचे दागिने, हीरे, चांदी आणि मोत्यांचे नेकलेस, घड्याळे आणि एका मर्सिडिझ बेंझ गाडीचा समावेश आहे.मेहुल चौक्सी हा नीरव मोदीचा मामा आहे. नीरव मोदी हा १३ हजार कोटी रुपयांहुन अधिकच्या कथित फसवणुकीच्या अन्य एका प्रकरणात आरोपी आहे. मेहूल चौक्सी हा भारतातून पसार झालेला आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार तो सध्या अँटिंग्वा आणि बर्बुडामध्ये राहत आहे.तर नीरव मोदी सध्या लंडनमधील कारागृहात बंद आहे. त्याला २०१९ मध्ये अटक करण्यात आली होत. त्याला अटकही करण्यात आली होती.