शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

विशाखापट्टणममधील गॅसगळतीसाठी हा विषारी वायू ठरला कारणीभूत, कशासाठी होतो त्याचा वापर? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 1:31 PM

विशाखापट्टणममध्ये झालेल्या या गॅस गळतीसाठी नेमका कुठला विषारी वायू कारणीभूत ठरला. या कंपनीमध्ये नेमके बनते काय? आणि तिथे या गॅसचा वापर कशासाठी होतो. असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत.

ठळक मुद्देविशाखापट्टणममधील विशाखा एलजी पॉलिमर कंपनीतून जो विषारी वायू लिक झाला आहे त्याचं नाव स्टीरीन आहेया वायूला एथनीलबेन्झीन असेही म्हणतात. हे एक सिंथेटिक केमिकल आहे. हे केमिकल रंगहीन द्रव्याच्या रूपात असतेस्टीरीन हा अत्यंत ज्वालाग्राही असतो. त्यामुळे त्याचे ज्वलन होते तेव्हा मोठ्या प्रमाणात विषारी वायूचे उत्सर्जन होते.

विशाखापट्टणम - एकीकडे देश कोरोना विषाणूच्या संकटात सापडला असतानाच आज आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे विषारी गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण पसरले. या गॅस गळतीमुळे शहरात आतापर्यंत ८ ते १० जणांच्या मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तसेच हजारो नागरिक आजारी पडले आहे. दरम्यान, विशाखापट्टणममध्ये झालेल्या या गॅस गळतीसाठी नेमका कुठला विषारी वायू कारणीभूत ठरला. या कंपनीमध्ये नेमके बनते काय? आणि तिथे या गॅसचा वापर कशासाठी होतो. असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. या प्रश्नांची उत्तरं खालील प्रमाणे आहेत.   विशाखापट्टणममधील विशाखा एलजी पॉलिमर कंपनीतून जो विषारी वायू लिक झाला आहे त्याचं नाव स्टीरीन आहे. या वायूला एथनीलबेन्झीन असेही म्हणतात. हे एक सिंथेटिक केमिकल आहे. हे केमिकल रंगहीन द्रव्याच्या रूपात असते. मात्र बराच वेळ हा गॅस ठेवला तर तो हलक्या पिवळ्या रंगाचा दिसतो.  

स्टीरीन हा अत्यंत ज्वालाग्राही असतो. त्यामुळे त्याचे ज्वलन होते तेव्हा मोठ्या प्रमाणात विषारी वायूचे उत्सर्जन होते. होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे माजी संचालक डॉक्टर डी. रघुनाथ राव यांनी सांगितले की, स्टीरीन गॅसचा वापर मुख्यत्वेकरून पॉलिस्टिरीन प्लॅस्टिक बनवण्यासाठी केला जातो.  

महत्वाच्या बातम्या...

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा १०००० पार; आज ७५९ नवे रुग्ण

OMG! राज्यात कोरोनाचा 'विस्फोट'; नव्या रुग्णांच्या संख्येने सरकारची चिंता वाढली

CoronaVirus धारावीने चिंता वाढवली; नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ

CoronaVirus व्वा...! राज्यात केवळ दोन दिवसांत ७०० रुग्ण ठणठणीत झाले

विशाखापट्टणममधील या फार्मा कंपनीत झालेल्या या गॅसगळतीमुळे आतापर्यंत ८ ते १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या गॅस गळतीमुळे सुमारे एक हजार लोक बाधित झाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सुमारे तीन किलोमीटरच्या परिसरात या वायू गळतीचा प्रभाव दिसून आला आहे. स्थानिक प्रशासन आणि नौदलाच्या जवानांनी कंपनीच्या आसपासच्या गावातून स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.  

टॅग्स :AccidentअपघातAndhra Pradeshआंध्र प्रदेशIndiaभारत