सुरत : जिल्ह्याच्या वालेरी गावात विषारी दारू प्यायल्याने ९ जण मरण पावल्याने खळबळ उडाली आहे. या ेनंतर जिल्हा प्रशासन व पोलिसांनी गावठी दारूचे अड्डे शोधायला सुरुवात केली आहे.गुजरातमध्ये दारूबंदी असून, ग्रामीण भागात गावठी दारू तयार केली जात असल्याचे दिसून आले. तीन दिवसांत ९ जण मरण पावल्याचे वृत्त आल्यानंतर जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी वालेरी गावाकडे रवाना झालेत. सर्व मृतांच्या शरीरात दारू व विषाचे अंश दिसून आले असल्याने ते विषारी दारूनेच मरण प्यायले असावेत, असा संशय असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.सर्वांच्या मृत्यूचे नेमके कारण कळावे, म्हणून त्यांचा व्हिेसरा फोरेन्सिक लॅबॉरेटरीकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच या गावात वा आसपासच्या परिसरात यापूर्वी कधी गावठी दारूचे अड्डे होते का, याचीही पाहणी करण्यास सांगितले आहे, असेही ते म्हणाले. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मयुरसिंह चावडा यांच्या नेतृत्वाखालील पथक गावात व आसपासच्या गावांत शोध घेत आहे. (वृत्तसंस्था)
विषारी दारूने गुजरातेत नऊ जणांचा बळी
By admin | Published: September 10, 2016 4:03 AM