- एस. पी. सिन्हा पाटणा - डेंग्यूने आजारी असलेल्या महिला पोलिसाला अधिकाऱ्यांनी रजा देण्यास नकार दिला आणि त्यानंतर कामावर असताना तिचा मृत्यू झाला, हे वृत्त येताच संतापलेल्या ४०० पोलीस व प्रशिक्षणार्थींनी उपअधीक्षकांच्या कार्यालयाची तोडफोड केली. तोडफोड करणाºयांमध्ये महिला पोलिसांची संख्या मोठी होती.या महिला पोलीस व प्रशिक्षणार्थींनी पोलीस उपअधीक्षक महम्मद मसहलुद्दीन यांना मारहाणही केली. तसेच त्यांनी नंतर पोलीस उपायुक्त व अधीक्षक पातळीवरील अधिकाºयांशी हुज्जत घालताना गैरवर्तन केले. त्यांना समजावण्यासाठी अधिकाºयांना हेल्मेट घालूनच यावे लागले. या प्रकाराची मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गंभीर दखल घेतली असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तीन दिवसांत अहवाल देण्याच्या सूचना त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत.
पोलीस व प्रशिक्षणार्थींचा पाटण्यात धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2018 5:18 AM