कानपूर : बेकायदा खाणीचा भ्रष्टाचार कसा चालतो, याचा अनुभव इटावाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक वैभव कृष्णा यांना स्वत:लाच आला. कृष्णा यांनी एका ट्रकवर हेल्पर असल्याचे भासवले होते आणि त्यांचा ट्रक जाऊ देण्यासाठी दोन पोलीस शिपायांनी त्यांच्याकडेच लाच मागितली होती. वैभव कृष्णा, त्यांचे जनसंपर्क अधिकारी जे. पी. यादव आणि गुन्हा शाखेचे प्रमुख सतीश यादव यांना खाकी वर्दीचा भ्रष्टाचारी चेहरा पाहावा लागला.हे तिघे मध्य प्रदेशातील भिंड येथून इटावामध्ये आले. प्रारंभी त्यांचा ट्रक उडी येथील क्रॉसिंगवर थांबविण्यात आला. येथे ट्रक पुढे जाऊ देण्यासाठी दोन पोलीस शिपायांनी कृष्णा यांच्याकडेपाच हजार रुपयांची लाचमागितली. कृष्णा हे मातीने भरलेल्या ट्रकवर मदतनिसाच्या वेशात प्रवास करीत होते.‘हो’ ‘नाही’ करत हा व्यवहार दोन हजार रुपयांत ठरला. नंतर कृष्णा यांनी त्यांची खरी ओळख सांगितली आणि पोलीस शिपाई लक्ष्मीकांत आणि शोभित कुमार या दोघांना त्यांनी तत्काळ ताब्यात घेतले.
पोलिसांनी जिल्हा अधीक्षकांकडेच मागितली लाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 4:14 AM