लखनौ - उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात काँग्रेसच्या आवाहनानंतर गायी बचाओ, किसान बचाओ यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेतील कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानं हिसंक वळण प्राप्त झालं आहे. पोलिसांच्या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. या पदयात्रेत शहरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. माजी केंद्रीयमंत्री प्रदीप कुमार जैन आदित्य यांच्या नेतृत्वात या पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्या नेतृत्त्वात खेत बचाओ, किसान बचाओ पदयात्रेचं राज्यभर आयोजन करण्यात आलं होतं. तसेच, गोवंशच्या संरक्षणाचाही मुद्दा या आंदोलनादरम्यान केंद्रस्थानी होता. महोबा येथील पदयात्रेदरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. आंदोलनाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी कार्यकर्त्याना रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला आहे. पोलिसांच्या या लाठीचार्जमध्ये काँग्रेसचे अनेक नेते आणि कित्येक कार्यकर्ते जखमी झाले आहेत, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुळशीदास लोधींनी म्हटलंय. काँग्रेसने गायी बचाओ, किसान बचाओ यात्रेचं आयोजन केलं होतं. या यात्रेदरम्यान, पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झुंबड उडाल्याची पाहायला मिळाली..
दरम्यान, या पदयात्रेदरम्यान, पोलिसांनी प्रदीप कुमार जैन आदित्य यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं.